MAKEUP BRUSH ची निवड कशी करावी? त्यांची काळजी कशी घ्यावी?

मेकअप ब्रश स्वच्छ धुऊन झाल्यानंतर ते संपूर्णपणे सुकल्याशिवाय परत मेकअप किटमध्ये ठेवू नयेत. ब्रश पूर्णपणे सुकले नाहीत तर मग ते खराब होऊ शकतात.मेकअप करताना ब्रशला एकावेळी एकच ब्युटी प्रॉडक्ट लावावे.

MAKEUP BRUSH ची निवड कशी करावी? त्यांची काळजी कशी घ्यावी?

मेकअप करताना ब्रशचा वापर उपयुक्त ठरत असतो. ब्रशचा वापर करून मेकअप केल्याने मेकअप उत्तमरीत्या केला जातो आणि त्याशिवाय तुमचा आरोग्य ही सांभाळले जाते. ब्रशचे विविध प्रकार आणि त्यांचा वापर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

सध्या बाजारात वेगवेगळ्या आकाराचे जाड, पातळ, मऊ असे अनेक मेकअप ब्रश असतात. यातील काही मेकअप ब्रश हे प्राण्यांच्या केसांपासून तयार केले जातात. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना प्राण्यांच्या त्वचेपासून बनवलेले मेकअप ब्रश वापरायला आवडत नाही. यासाठी बाजारात रियल ह्युमन हेअर पासून बनवलेले ब्रश सुद्धा उपलब्ध असतात. काही प्रकारचे मेकअप ब्रश खोट्या आर्टिफिशियल केसांपासून तयार केलेले असतात. आपण मेकअप करताना ब्युटी प्रॉडक्ट सहजपणे आपल्या चेहऱ्यावर लावता येतील, अशा ब्रशचा वापर केला पाहिजे. ब्रश आकाराने फारच मोठे किंवा छोटेही नसावेत. ब्रश आपल्याला व्यवस्थित हाताळता येतील अशा आकाराचे असावेत.

मेकअप ब्रश खरेदी करताना मेकअप ब्रशला असणाऱ्या केसांची क्वालिटी चेक करून मगच ते विकत घेतले पाहिजेत. मेकअप ब्रश हातात पकडल्यानंतर त्या ब्रशला पकडताना व्यवस्थित पकड आहे की नाही याची खात्री करून घेणे ही आवश्यक आहे. आपल्या किटमध्ये ज्या मेकअप ब्रशची जागा आहे, त्याच ठिकाणी ते ठेवले गेले पाहिजेत. उगाच गरज नसताना अनेक मेकअप ब्रश खरेदी करणे सोयीचे ठरणार नाही. प्रत्येक अवयवांचा म्हणजेच डोळ्यांचा, आयशाडो लावण्याचा, आय लाइनर लावण्याचा तसेच लिपस्टिक साठीचा ब्रश म्हणजे प्रत्येक अवयवानुसार प्रत्येकाच्या ब्रशची जागा वेगवेगळे ठेवावी. आयब्रो ब्रश, ब्लशर, ब्रश फाउंडेशन ब्रश असे तीन मुख्य मेकअप ब्रश आपल्याला मेकअप किट मध्ये जरूर असले पाहिजेत.

मेकअप करून झाल्यानंतर मेकअप ब्रश स्वच्छ करून ठेवणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी आपण माईल्ड शाम्पू किंवा साबणाचा वापर करू शकता. काही वेळा वारंवार ब्रश धुतल्यामुळे ते खराब होऊ शकतात. त्यामुळे कधीतरी फक्त पाण्याने ब्रश धुऊन घ्यावेत. त्यानंतर स्वच्छ सुती कापडाने ते पुसून घ्यावेत. यामुळे आपले मेकअप ब्रश स्वच्छ होण्यास मदत होईल. जेव्हा कधी आपण हे मेकअप ब्रश वापराल, त्यानंतर स्वच्छ करायला विसरू नका. मेकअप ब्रश स्वच्छ धुऊन झाल्यानंतर ते संपूर्णपणे सुकल्याशिवाय परत मेकअप किटमध्ये ठेवू नयेत. ब्रश पूर्णपणे सुकले नाहीत तर मग ते खराब होऊ शकतात.मेकअप करताना ब्रशला एकावेळी एकच ब्युटी प्रॉडक्ट लावावे. जर मेकअप ब्रशला एकावेळी अनेक ब्युटी प्रॉडक्ट जर लावले तर ते चेहऱ्यावर लावता येणार नाहीत.

हे ही वाचा:

डॉ. देवेंद्र फडणवीस गृह खात्यावर वचक ठेवण्यात अपयशी, NCP चा तक्रारीचा सूर

बूस्टर डोस घेण्यासाठी KDMC आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version