पावसाळ्यात मेकअप कसा टिकवायचा? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

पावसाळ्यात मेकअप कसा टिकवायचा? मग ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

‘या’ टिप्स नक्की फॉलो करा.

पावसाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो धो – धो पडणारा पाऊस, खमंग भजी, वाफाळलेला चहा आणि बरंच काही. पण, जितक्या सुखद कल्पना हा पाऊस त्याच्यासोबत घेऊन येतो तितकीच आव्हानं सुद्धा आणि या पावसाळ्यात बाहेर पडताना दरवेळी स्त्रियांना तारेवरची कसरत करावी लागते ती आपला मेकअप जपण्यासाठी. बाजारात कितीही वॉटरप्रुफ मेकअप प्रॉडक्ट्स उपलब्ध असले तरी नक्की कोणतं प्रॉडक्ट वापरावं? मेकअप नक्की कसा करावा? हा संभ्रम अनेक स्त्रियांमध्ये असतो. त्यामुळे आता आपण मॉन्सून मेकअप लाँग लस्टिंग कसा करता येईल याच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.

वॉटर – बेस्ड मॉइश्चरायझर वापरा: त्वचेला तजेलदार, स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी कोणत्याही ऋतूत मॉइश्चरायझर वापरणे गरजेचे आहे. पावसाळ्यात त्वचा तजेलदार आणि ऑईल – फ्री ठेवण्यासाठी वॉटर – बेस्ड मॉइश्चरायझर वापरावेत. कारण या मॉइश्चरायझरमध्ये त्वचेतील जास्तीच तेल शोषून घेण्याची क्षमता असते.

बर्फ टिकवेल मेकअप: पावसाळ्यात मेकअप करण्याआधी जर चेहऱ्यावर बर्फ लावला तर मेकअप खराब होण्याच्या फार कमी शक्यता असतात. त्यामुळे मेकअप करण्याआधी जर तुम्ही चेहऱ्यावर बर्फ लावलात तर तुमचा मेकअप खूप काळ टिकू शकेल.

मेकअप असावा लाईट: पावसात भिजल्यावर मेकअप निघून जाईल म्हणून खूप मेकअप करणे किंवा सतत टच – अप करत राहिल्याने मेकअप लूक खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रॉडक्ट्स नीट ब्लेंड करून लाईट मेकअप केल्यास तो जास्त वेळ टिकतो.

योग्य प्रॉडक्ट निवडा: पावसाळ्यात मेकअप टिकावा म्हणून तुम्ही तुमचे नेहमीचे प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा जर वॉटरप्रुफ प्रॉडक्ट्स, जसे की वॉटरप्रुफ आयलायनर, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट वापरल्यास मेकअप पावसाळ्यात धुतला जात नाही. तसेच पावसाळ्यात आयब्रो पेन्सिल आणि काजळ वापरणे टाळावे. कारण त्यामुळे मेकअप खराब होण्याची जास्त शक्यता असते.

सेटिंग स्प्रे: मेकअप झाल्यावर सेटिंग स्प्रेने सेट केल्यास, त्वचा चमकदार होते व तसेच, मेकअप खूप काळ टिकण्यास मदत होते. तसेच सेटिंग स्प्रे तुमच्या मेकअपला एक फिनिशिंग टच देतो.

हेही वाचा : 

“एक आमदार असणाऱ्याकडे 105 आमदार असणारा नेता जातो…” राज ठाकरे व फडणवीस यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला

Exit mobile version