spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नोकरीसाठी रेझ्युमे कसा करावा ?

कोणतीही नोकरी शोधते वेळी रेझ्युमे / सी व्ही / बायो डेटा ही पहिली पायरी असते, आणि ती हि अतिशय महत्वाची असते. याचे महत्वाचे कारण म्हणजे तुम्ही कोण आहात आणि उपलब्ध जागेसाठी योग्य आहात की नाही हे कंपनीला कळण्याचे रेझ्युमे हे पहिले माध्यम असते.

कोणतीही नोकरी शोधते वेळी रेझ्युमे / सी व्ही / बायो डेटा ही पहिली पायरी असते, आणि ती हि अतिशय महत्वाची असते. याचे महत्वाचे कारण म्हणजे तुम्ही कोण आहात आणि उपलब्ध जागेसाठी योग्य आहात की नाही हे कंपनीला कळण्याचे रेझ्युमे हे पहिले माध्यम असते. रेझ्युमे हा जणू तुमच्या व्यक्तिमत्त्वाचाच आरसा असतो.

रेझ्युमे म्हणजे काय? –

तर एका विशिष्ठ प्रकारे ( फॉरमॅट ) मध्ये दिलेली तुमच्याबद्दलची आणि तुमच्या व्यावसायिक आयुष्याबद्दलची माहिती, शैक्षणिक माहिती, तुमचा लेखा-जोखा असणे होय. त्यात काही माहिती दिली जावी असे सर्वमान्य संकेत आहेत. रेझ्युमे बनवण्यामागचा हेतू लक्षात घेणे गरजेचे आहे. सरसकट सर्व अर्जासाठी एकच रेझ्युमे असणे तितकेसे योग्य ठरणार नाही. आपण कोणत्या हुद्दय़ासाठी, कोणत्या कार्यालयीन विभागासाठी अर्ज करत आहोत, नोकरी देणारी कंपनी कोणत्या प्रकारची आहे (सरकारी/ निमसरकारी/ खासगी/ महामंडळे), आवश्यक शिक्षण, अपेक्षित अनुभवक्षेत्र आणि अनुभवाचा कालावधी. या माहितीत प्रत्येक वेळी थोडेफार फेरफार करून रेझ्युमे बनवणे परिणामकारक ठरते.

आपला रेझ्युमे चांगल्या पद्धतीने लिहण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत, त्या खालील प्रमाणे:-

  • A४ आकाराच्या पानात बनवावा.
  • चारी बाजूला जागा सोडावी . डाव्या बाजूला थोडीशी जास्त.
  • रेझ्युमेचा उद्देश जाणून घ्या :- साधारणपणे एक रेझ्युमे ३० सेकंदांमध्ये स्कॅन केला जातो. जर तुमचा रेझ्युमे दोन पृष्ठांपेक्षा अधिक असल्यास तो समजून घ्यायला आणि वाचण्यास खूप वेळ जातो. त्यामुळे आपण कोण आहात आणि आपण काय करता याचा थोडक्यात आढावा देण्यासाठी करियर सारांश तयार करा. हा सारांश ज्या पदासाठी अर्ज करताय त्यास अनुसरुन असावा.
  • ऑफिशल ई-मेल पत्ता तयार करा :- ई-मेल ID मध्ये तुमचे टोपणनाव, पाळीव प्राण्याचे नाव, आवडता विषय, संख्या, प्रतीके किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक माहिती देणे टाळा. उदा. [email protected] . चुकीच्या ई-मेल पत्त्याचा वापर केल्याने ७६% रेझ्युमे नाकारले जातात असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ई-मेल ID मधे आपले नाव आणि आडनाव वापरा. याशिवाय ई-मेल वारंवार तपासा, म्हणजे आपण वेळेवर नियोक्ता चौकशीस प्रतिसाद देऊ शकता.
  • अद्ययावत माहिती द्या :- रेझ्युमेच्या सुरुवातीलाच स्वत:चे नाव, पत्ता, संपर्क पत्ता, मोबाईल, ई-मेल याची खरी, अद्ययावत आणि पूर्ण माहिती मोठय़ा आणि ठळकपणे देणे गरजेचे आहे. कारण या माहितीच्या आधारेच नियुक्त करणारी संस्था आपल्याशी संपर्क साधू शकेल. तसेच चुकीचा संपर्क क्रमांक टाकू नये .
  • उलट-कालानुक्रम वापरा :- तुमच्या रेझ्युमेच्या शिक्षण विभागात प्रथम तुमची सर्वोच्च पदवी लिहा. अश्याच प्रकारे तुमच्या अनुभव विभागासाठी, तुमची वर्तमान नोकरी प्रथम ठेवा.
  • रेझ्युमे चा फॉन्ट :- साधे, सरळ, सर्वत्र उपलब्ध आणि वाचनीय फॉन्ट वापरा. उदा – Arial, Calibari, MS Sans Serif इ. अनेक फॅन्सी फॉन्ट सर्वत्र उघडत नाहीत आणि फॉरमॅटिंग बिघडते. एकाच फॉन्ट च्या वेगवेगळ्या साईझ ( ८,९,१०,१२ ) आणि बोल्ड – इटॅलिक मधून व्यवस्थित काम करता येते.
  • रेझ्युमेच्या कॉपी चा फाईल फॉरमॅट :- अनेकदा आपण MS-Word वापरुन रेझ्युमे बनवतो. परंतु कधीपण नोकरीसाठी रेझ्युमे पाठवताना तो PDF फॉरमॅट मधे जतन करून पाठवणे योग्य. PDF म्हणून तुमचा सारांश जतन करण्याचा लाभ हा आहे की उघडल्यानंतर त्याचे स्वरूप बदलणार नाही. तसेच फाईल ला आपले पूर्ण नाव द्यावे. उदा. Sohan Shinde Resume.pdf
  • तुमची ऑनलाइन उपस्थिती ठेवा :- व्यवस्थापक ऑनलाईन देखील तुमचा शोध घेतात. त्यामुळे ऑनलाईन नोकरी च्या पोर्टल जसे नौकरी, टाइम्स जॉब्स, मॉन्स्टर जॉब्स, क्विकर यांवर आपले प्रोफाइल बनवून रेझ्युमे अपलोड करा. तसेच नेहमी तुमच्या लिंक्डइन प्रोफाइलला अपडेट करा, जेणेकरून ते तुम्हाला एखाद्या नवीन जॉब साठी रिस्पॉन्स देतील.
  • कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती देण्याची कला अवगत करा.
  • इंग्लिश ग्रॅमर :- एकदा तुमचा रेझ्युमे बनवून झाला कि त्याच्यात स्पेल्लिंग व व्याकरण तपासून घ्या.

मित्रहो, सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरीच्या एका जागेसाठी हजारो अर्ज दाखल होत असतात. दरवेळी अर्ज करत असताना, जाहिरातीतील नोकरी जणू काही आपल्यासाठीच निर्माण झाली आहे असा विश्वास उमेदवाराला वाटत असतो. तोच विश्वास नोकरी देणाऱ्या कंपनीला/व्यक्तीला आपल्याबद्दल वाटेल तेव्हाच मुलाखतीला जाण्याची संधी मिळेल, आणि हे उद्दिष्ट उत्तम रेझ्युमेतूनच साध्य होते.

 

हे ही वाचा:

जाणून घ्या… बदाम खाण्याचे फायदे

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss