चपातीचे चटपटीत चाट कसे करावे…जाणून घ्या रेसिपी

शिळ्या चपातीचा चिवडा, लाडू, भजी तुम्हाला माहितच असेल. पण तुम्ही हे चपातीचे चटपटीत चाटही तयार करू शकता. ते ही अगदी साधी आणि सोपी पध्दत वापरून.

चपातीचे चटपटीत चाट कसे करावे…जाणून घ्या रेसिपी

चपाती हा प्रत्येक घरात तयार केला जातो. काही ठिकाणी याला चपाती, पोळी किंवा रोटी म्हणतात. अनेकदा लहान मुलांना चटपटीत खाऊ हवा असतो. अशा वेळी तुम्ही मुलांना घरीच चटपटीत पोळ्यांचे चाट तयार करून देऊ शकता. काही लोकं सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळात चपाती खातात. परंतु, अनेकदा एक्स्ट्रा चपाती उरते. घरात शिळी चपाती कोणी खात नाही. तसेच बऱ्याच वेळा उरलेल्या पोळ्यांचे काय करावं हा प्रश्नच असतोच. शिळ्या चपातीचा चिवडा, लाडू, भजी तुम्हाला माहितच असेल. पण तुम्ही हे चपातीचे चटपटीत चाटही तयार करू शकता. ते ही अगदी साधी आणि सोपी पध्दत वापरून. चला तर मग पाहूया चटपटीत चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची कृती.

साहित्य

चपाती
तूप
मीठ
लाल तिखट
टॉमेटो
कांदा
कोथिंबीर
शेव

कृती

सगळ्यात आधी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवावे. पॅन गरम झाल्यानंतर शिळी चपाती गरम करावी. किचन नॅपकिनने हलक्या हाताने चपाती दाबून दोन्ही बाजूने शेकावावे. यामुळे चपाती कडक होईल. कडक झालेली चपाती एका प्लेटवर ठेवावी. त्यावर अर्धा चमचा तूप घालावे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून साहित्य चपातीवर ठेवावे. त्यानंतर एक भांडे घ्या. त्यात कडक चपातीला मोडून छोटे – छोटे तुकडे करावेत. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टॉमेटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सर्व मिश्रण मिक्स करावे. त्यात बारीक शेव देखील मिक्स करावी. अशाप्रकारे अगदी सोप्या आणि साध्या पध्दतीने हे चपातीचे चटपटीत चाट तयार होईल. मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणूनही हा उत्तम पदार्थ आहे.

हे ही वाचा:

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्येही वाघांचं दर्शन होणार, वनमंत्र्यांची माहिती

रस्त्यांवरील खड्डयांविरोधात मनसे कार्यकर्त्ये आक्रमक

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकार करणार एक लाख कोटींची तरतूद

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version