Monday, July 1, 2024

Latest Posts

पावसाळ्यात ट्रॅकिंग ला किंवा फिरायला जाताना काळजी कशी घ्याल ?

ना आपल्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तीला आपणं कुठे जात आहोत याची माहिती द्या. पावसाळ्यात शक्यतो गर्दीच्या ठिकाणावर जाणं टाळलं पाहिजे. ज्या ठिकाणी फिरायला जायचं आहे तिथली माहिती, सोयी सुविधा या सगळ्यांचा विचार करुनच फिरण्याचा विचार करा.  

पावसाळा सुरु झाला की हिरव्या गार निसर्गाच्या सानिध्या आंनद लुटण्यासाठी अनेकांना बाहेर फिरण्याची इच्छा होते. आपल्या कुटुंबासोबत, मित्र परिवारासोबत बाहेर फिरण्याचे प्लॅन करतात. लोणावळा, माथेरान, खंडाळा, माळशेज घाट, अशा अन्य ठिकाणी मौजमज्जा करण्यासाठी नागरिक जात असतात.या मौजमज्जेत आपली काळजी कशी घ्यावी याचा अनेकांना विसर पडतो आणि आपला जीव गमावतात. पण फिरायला जात असताना काळजी कशी घ्यावी हेच आपण पाहुयात..

पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने अनेक जणांना धबधबा, तलाव, समुद्र किनारी आणि ट्रॅकिंगला जाण्याची अनेक पर्यटकांना इच्छा होते. त्यामुळे ते धम्माल, मस्ती करण्याच्या नादात आपल्या जीवाची पर्वा करत नाही. लोहगडावर लहान मुले ट्रॅकिंग साठी गेले असता त्यांना उतरण्याचा मार्ग न मिळाल्याने ते बेपत्ता झाली. नुकतचं पुण्यातील लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात एका कुटुंबातील पाच जण वाहून गेले. त्या दुर्दैवी घटनेत कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला त्यामुळे आपण कुठे ही फिरायला जात असताना आपल्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तीला आपणं कुठे जात आहोत याची माहिती द्या. पावसाळ्यात शक्यतो गर्दीच्या ठिकाणावर जाणं टाळलं पाहिजे. ज्या ठिकाणी फिरायला जायचं आहे तिथली माहिती, सोयी सुविधा या सगळ्यांचा विचार करुनच फिरण्याचा विचार करा.

पावसाळ्यात मित्रमंडळी सोबत गड-किल्ल्यावर जाण्याचा विचार अनेक मुलांच्या मनात येतो. त्यावेळी एखाद्या किल्ल्यावर पोहाचणं आपल्याला शक्य आहे का याचा देखील विचार करावा. ट्रॅकिंग करण्यासाठी जाताना किंवा फिरायला जाताना एक दोरी, First Aid चे साहित्य, टॉर्च, यासगळ्या गोष्टी असणं आवश्य आहे. सध्या आपण कुठे ही गेलो तरी फोटो आणि रिल्स काढणं हे अत्यावश्यक झालं आहे. त्यामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. परंतु पाण्याच्या ठिकाणी गेल्यास फोटो आणि रिल्स काढणं टाळलं पाहिजे. सेल्फी आणि रिल्स च्या आपल्या सुरक्षेचा विसर पडू देऊ नका.

सावधान आणि संतर्कतेचे फलक हे अशा ठिकाणी लागलेले असतात. मात्र या फलकांना दुर्लक्षित करुन आपल्या जीवाचा खेळ करु नका. धबधबा, दऱ्या यांसारख्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी किंवा रिल्स बनवण्यासाठी नको ते धाडस करणं टाळायला पाहिजे. या सगळ्या कृती करण्याआधी आपल्या जीवाचा आणि कुटुंबियांचा विचार केला पाहिजे. धबधबा, तलाव, गडकिल्ले या ठिकाणी पावसाळ्यात फिरण्यासाठी जाणं देखील टाळलं  पाहिजे. पाण्याचा प्रवाह हा अतिप्रमाणात असल्याने आपल्याला त्याचं भान राहतं नाही आणि त्यामुळे निष्पाप जीव गमावला जातो. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या ठिकाणी फिरायला जाण्याचं टाळा अथवा फिरायला गेल्यास सावधानता बाळगा.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss