उन्हाळ्यात आपल्या बागेतील झाडांची अशी घ्या काळजी…

उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. बाहेर प्रचंड ऊन आहे. अश्या वेळी सर्वच जण बाहेर जाणं टाळतात उन्हाचा त्रास हा प्रत्येकालाच जाणवतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांनादेखील हानी पोहोचते. बऱ्याच जणांच्या घरामध्ये छोटी छोटी झाडे, रोपटी लावलेली असतात. उन्हाळ्यामध्ये यांची काळजी घेणं असह्य होऊन जात. बऱ्याचदा हि झाडे सूकूनदेखील जातात. मग उन्हाळ्यात या झाडांची काळजी कशी घ्यायची हे आज जाणून घेऊयात

उन्हाळ्यात आपल्या बागेतील झाडांची अशी घ्या काळजी…

उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. बाहेर प्रचंड ऊन आहे. अश्या वेळी सर्वच जण बाहेर जाणं टाळतात उन्हाचा त्रास हा प्रत्येकालाच जाणवतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांनादेखील हानी पोहोचते. बऱ्याच जणांच्या घरामध्ये छोटी छोटी झाडे, रोपटी लावलेली असतात. उन्हाळ्यामध्ये यांची काळजी घेणं असह्य होऊन जात. बऱ्याचदा हि झाडे सूकूनदेखील जातात. मग उन्हाळ्यात या झाडांची काळजी कशी घ्यायची हे आज जाणून घेऊयात.

झाडांना ऑक्सिजन हा पाण्याद्वारे मिळत असतो. बऱ्याचदा कामाच्या घाई गडबडीत झाडांना पाणी देणं आपण विसरतो. म्हणून दिवसातून किमान दोनदा अथवा खूपच ऊन असेल तर तीनदा तरी पाणी द्यावं. जेणेकरून झाड जळणार नाहीत आणि ताजेतवाने देखील राहतील.

अगदीच उन्हात ठेवण्याऐवजी झाडे मोकळ्या हवेत पण सावलीत ठेवा. डायरेक्ट उन्हाच्या संपर्कात आल्याने झाडांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून झाडे उन्हात ठेवणे टाळा.

झाडांचे पोषण हे त्यांच्या खताद्वारे येते त्यामुळे झाडांना वेळोवेळी पोषण देत राहणे गरजेचे आहे. झाडांच्या पोषणासाठी तुम्ही सेंद्रिय खाते देखील वापरू शकता.

माती थंड कशी राहील यावर लक्ष ठेवा. तुम्ही कोरड्या पानांचा किंवा रंगबेरंगी पेबल्सचा यासाठी वापर करू शकता. ते लावल्याने माती थंड राहते. आद्र्ता टिकून राहते.

उन्हाळ्यात जी झाडे जास्त काळ टिकतील असे झाडे लावा. झेंडू , जास्वंद सारखी रोपे उन्हाळ्यात टिकू शकतात.

बऱ्याचदा झाडांची पाने फुले सुकून जातात अश्या वेळी ती कापून टाकणेच योग्य असते. म्हणून आठवड्यातून एकदा तरी झाडांकडे लक्ष देऊन सुकलेले भाग कापून टाकावेत.

पाणी झाडांना द्यावं पण योग्य त्या वेळी योग्य तितकच द्यावं. अति पाणी हे देखील झाडांच्या नाशाला कारणीभूत असते. म्हणून झाडांना योग्य प्रमाणात पाणी द्यावं.

जर गरज असेल तर झाडांची कुंडी बदलावी. बऱ्याचदा कुंड्यांना तडा गेलेला असतो. ज्यामुळे माती ओलसर राहत नाही. म्हणून जमेल तसे झाडांच्या कुंडी बदलायला हव्यात.

झाडांच्या मातीतील ओलसरपणा टिकवायचा असेल तर झाडांमध्ये पाने टाका किंवा इकडे पोते ओले करून ते कुंडीभोवती गुंडाळावे. पोते लवकर सुकत नसल्याने बऱ्याच काळ मातीला ओलसरपणा देते.

 

हे ही वाचा:

EXCLUSIVE: लता एकनाथ शिंदे; Shrikant Shinde फक्त निवडूनच येणार नाही तर मंत्रीदेखील होणार!

कार्यकर्त्यांची नाराजी दूर करेन असा Ganesh Naik यांचा शब्द, Naresh Mhaske यांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version