हृदयाची काळजी कशी घ्यावी

. वाढत्या तणावाचा मन आणि शरीरासह हृदयावरदेखील गंभीर परिणाम होत असतो.

हृदयाची काळजी कशी घ्यावी

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे आरोग्यावर लक्ष देता येत नाही. कोरोनाच्या कारणामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे परिणामी चिंता वाढू लागल्या अनेकांना ताणतणावामुळे डोकेदुखी, आजारी पडणे, हातपाय दुखणे यासारखी लक्षणे जास्त वाढू लागली. वर्क फॉर्म होम केल्याने काहींची व्यायाम करण्याची सवय मोडली गेली एकाच जागी जास्त वेळ बसून राहणे हालचाल न होणे यामुळे हृदयविकराच्या समस्या खूप वाढत गेल्या.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज ८ तासांची झोप घेतली पाहिजे. सध्याच्या जीवनशैलीमध्ये अनेकजण रात्री उशीरापर्यंत जागतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असलेले झोप मिळत नाही. यामुळे हार्मोन मेलाटोनिनचे प्रमाण कमी होऊन तणाव वाढतो. ज्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवावे. वजन जास्त असेल तर हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी शक्यतो साखरेचे प्रमाण कमी करा तुम्ही अतिरिक्त साखरेचा वापर टाळावा. वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम आणि व्यवस्थित डाएट घेतला पाहिजे.

आपल्या आहारात सर्व प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, डाळी आणि शेंगा खाव्यात. तळलेले, तेलकट पदार्थांपासून दूर राहा.

हृयविकाराच्या आरोग्याचा विकार कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. त्यामुळे शरीर निरोगी राहते.

आपल्याला तणाव येत असल्यास त्याचे वेळीच नियोजन करावे. मनाला आनंद वाटेल अशा गोष्टी कराव्यात. जेणेकरुन या तणावातून मुक्त होण्यास तुम्हाला मदत होईल. वाढत्या तणावाचा मन आणि शरीरासह हृदयावरदेखील गंभीर परिणाम होत असतो.

हे ही वाचा:

पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, येणार आशय कुलकर्णी आणि आनंद पंडित यांच्या ‘व्हिक्टोरिया’ साठी एकत्र

बिग बॉस १६ च्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version