Wednesday, September 25, 2024

Latest Posts

घरी शुभ कार्य झाले असेल तर पितृपक्षात पितरांना तर्पण, पिंडदान, दान करावे की नाही ? याबद्दल जाणून घ्या सविस्तर…

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात पंधरा दिवसांचा काळ हा पितृपक्ष मानला जातो. हा काळ पितरांसाठी महत्वाचा असतो आणि सध्या हा कालावधी सुरु आहे. या विशिष्ट कालावधीत पितरांच्या शांतीकरिता विविध विधी केले जातात.या काळात विविध ठिकाणी अनेक परंपरा पाळल्या जातात. तसेच आपल्या घरी लग्न, वास्तुशांत, मुंज अशी शुभ कार्ये झाली असतील तर पितरांना तर्पण करावे का नाही याबाबत बऱ्याच लोकांच्या मनात वेगवेगळे गैरसमज असतात.

याबाबत ज्योतिषी पंडित राकेश पांडे यांनी एका वृत्तवाहिनीला असे सांगितलं आहे की, ज्यांच्या घरी या वर्षी वास्तुशांती, मुंज, लग्न यांसारखे इतर काही शुभकार्य झाले असतील त्यांनी पितरांना पिंडदान किंवा तर्पण, दान करू नये अशी खूप लोकांची समजूत असते. हा काळ अशुभ आहे त्यामुळे हे करू नये, तर ही समज पूर्णपणे चूक आहे. ज्यांच्या घरी लग्न कार्य, मुंज, वास्तुशांती अशी काही किंवा इतर काही शुभ कार्य पार पडली असतील तर पिंडदान, पितरांची शांत, दान अर्पण करावे.

खूप लोकांचा असा समज असतो की, जर आपण घरात शुभ कार्य केले असेल तर पितृपक्षाच्या काळात पितरांची शांती करणे किंवा दान धर्म करणे यांसारख्या कृती करू नयेत. मात्र हा लोकांचा मोठा गैरसमज आहे. ज्योतिषी राकेश पांडे म्हणतात की, हिंदू धार्मिक आणि धर्मग्रंथांमध्ये ‘मातृ देवो भव’ आणि ‘पितृ देवो भव’ यांचे वर्णन केले आहे. म्हणजेच आई वडिलांसारखे देव नाही. जेव्हा आपले वडीलधारे, पूर्वज आपल्यावर खुश असतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वादच मिळणार आहेत. त्यामुळे या काळात पितरांचे दरवर्षी श्राद्ध, तर्पण यांसारख्या गोष्टी न चुकता कराव्यात. त्याचबरोबर अन्न, वस्त्र, पाणी यांचेही दान करावे. अश्या सर्व कृतींमुळे आपल्याला पितरांकडून आर्शिर्वाद मिळतो.

हे ही वाचा:

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…

Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss