आहारात मीठ,साखर व तेलाचे प्रमाण जास्त असल्यास आरोग्यासाठी धोकायदायक

आहारात मीठ,साखर व तेलाचे प्रमाण जास्त असल्यास आरोग्यासाठी धोकायदायक

तुम्हाला तुमचे शरीर निरोगी आणि फिट पाहिजे असेल तर जेवणात मीठ , साखर , तेल याचे प्रमाण कमी केले पाहिजे. हे असे पदार्थ आहेत की रोजच्या जेवणात वापरले जाते. पण लोकांना तेल , मीठ , साखर किती प्रमाणात वापरावे याची कल्पना नसते. हे पदार्थ आपल्या आरोग्यास हानिकारक असू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्व देशांना याबाबत यापूर्वीच इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक देशांनी बाजारात विकल्या जाणार्‍या उत्पादनांवर मीठ, साखर आणि फॅटचे प्रमाण पाहून बंदी घातली आहे.

हे ही वाचा : महिलांसाठी उपयोगी असलेले काही खास योगासने

 

आपण रोजच्या दिवसात कमी मीठ वापरले पाहिजे. त्याच प्रमाणे साखरेचे प्रमाण 6-8 चमचे १ दिवसात वापरावे . तसेच तेल १ दिवसात ४ चमचे तेल वापरावे त्याहून जास्त वापरू नये.

मीठ, तेल किंवा साखर जास्त प्रमाणात वापरल्यास त्यातून अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. या पदार्थांमुळे हृदयविकार, किडनी आणि मधुमेह सारखे आजार होऊ शकतात. आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, तुम्ही आहारात मीठ, तेल, आणि साखरेचे प्रमाण कमी केल्यास लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार दूर होतील.

 

बाजारात मिळणाऱ्या पदार्थांचा वापर काही काळापासून झपाट्याने वाढला आहे. बाजारात मिळणाऱ्या या खाद्यपदार्थांमध्ये खूप प्रमाणात मीठ असते. फ्राइड नट्स आणि बटाट्याच्या वेफर्समध्ये मीठ भरपूर असते. याशिवाय नूडल्स, सॉस आणि पॅकेट सूप हेही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. जास्त मीठ आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे रक्तदाब वाढतो जो हृदयासाठी धोकादायक असतो. उच्च सोडियम पातळी रोगांचा धोका वाढवते.

हे ही वाचा :

हिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

 

Exit mobile version