चेहरा गोरा पण मान काळपट तर करा हे उपाय

चेहरा गोरा पण मान काळपट तर करा हे उपाय

मान ही अशी जागा आहे जी घामाच्या संपर्कात येते. (How To Remove Neck Tanning) जास्त घाम आल्याने मान घामामुळे काळी दिसू लागते. काळ्या मानेमुळे अनेक वेळा आवडीचे कपडे घालताना तडजोड करावी लागते. चेहऱ्याचा आणि त्वचेचा रंग वेगळा असल्याने अनेकवेळा अवघडल्यासारखे वाटते. अनेक वेळा दुर्लक्ष केल्याने, किंवा , खोटे दागिने घातल्याने मान काळी पडते. मग खूप काही करूनही डाग निघत नाही, चेहरा छान दिसतो पण मान काळी दिसते . मानेचा काळपट कमी करण्यासाठी करा हे घगूती उपाय .

हे ही वाचा : जंक फूड खाल्याने आरोग्यावर हे घातक परिणाम होतील

 

हळद, बेसन आणि दूध एकत्र करून स्क्रब बनवा. हा स्क्रब संपूर्ण मानेवर नीट लावा. १५ ते २० मिनिटे ठेवा त्यानंतर पाण्याने धुवा. या मिश्रणामध्ये मलाई देखील मिसळता येते, ज्यामुळे मानेची त्वचा मऊ आणि स्वच्छ होईल.

एक मऊ टॉवेल घ्या आणि गरम पाण्यातुन पिळून घ्या आणि त्यानंतर तो टॉवेल घेऊन मान पुसून काढा .

 

नारळाच्या तेलाने त्वचेवरील घाण निघून जाते आणि रंध्रे स्वच्छ होतात. या पेस्टमध्ये नारळाच्या तेलाचे काही थेंब टाकून याला मिक्स करा.

बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल मिसळून तयार केलेली पेस्ट लावल्याने काळ्या मानेची समस्या दूर होईल.

कोरफड आणि मुलतानी माती हे दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. कोरफड आणि मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून मानेवर लावा. मिश्रण कोरडे होईपर्यंत ठेवा, नंतर कोमट पाण्याने धुवा. मानेवरील डाग साफ होऊन काळेपणा दूर होऊन रंग उजळतो. हे मिश्रण चेहऱ्यावरही लावता येते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतील.

हे ही वाचा :

शांत झोप लागण्यासाठी करा हे उपाय

 

Exit mobile version