जेवणात जास्त मीठ पडल्यास ‘या’ टिप्स वापरून करा चूक दुरुस्त…

आपल्या अन्नाला चविष्ट बनवण्यासाठी मीठ हा पदार्थ खूप जास्त महत्वाचा आहे. बरेच वेळा खूप चांगला स्वयंपाक बनवलेला असताना, केवळ त्यात मीठ जास्त पडले कि आपल्या तोंडाची चव पूर्ण खराब होते.

जेवणात जास्त मीठ पडल्यास ‘या’ टिप्स वापरून करा चूक दुरुस्त…

आपल्या अन्नाला चविष्ट बनवण्यासाठी मीठ हा पदार्थ खूप जास्त महत्वाचा आहे. बरेच वेळा खूप चांगला स्वयंपाक बनवलेला असताना, केवळ त्यात मीठ जास्त पडले कि आपल्या तोंडाची चव पूर्ण खराब होते. बऱ्याच लोकांना जेवणात जास्त मीठ खायला आवडते. मात्र दररोज जास्त मीठाचे सेवन करणे आरोग्यास हानिकारक आहे. बरेच वेळा आपण अन्न शिजवतो तेव्हा कमीतकमी मीठ घालण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या पदार्थात मीठ कमी पडत असेल तर, त्याचे प्रमाण वाढवता येते. परंतु जास्त मीठ पडल्यास काय करावे, हे समजत नाही. अश्या परिस्थिती अन्न फेकून दिले जाते किंवा जास्त प्रमाणात मीठ दुरुस्त करण्याच्या या पदार्थाची चव निघून जाते. जर तुमच्याकडून देखील अशी चूक झाली असेल किंवा अन्नाची नासाडी झाली असेल तर… अश्यावेळी काय बरं करावे? तर या खालील टिप्स नक्की वाचा

तूप –

पदार्थामध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये २-३ चमचे तूप घालणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे पदार्थांमधील मीठाचे प्रमाण संतुलित राहते.

लिंबाचा रस –

तुम्ही तयार केलेल्या भाजीमध्ये मीठ जास्त झालं, तर त्यामध्ये लिंबाचं रसाचे ४-५ थेंब टाकावे. त्यामुळे मीठाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि भाजीची चवही बिघडत नाही.

बटाटा –

जर तुम्ही रस भाजी बनवताना मीठ जास्त झाल असेल तर अश्यावेळी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकतात. यामध्ये बटाट्याचे काप घाला. बटाटा पदार्थातील मीठ शोषून घेईल आणि त्यामुळे त्याची चव सामान्य होईल. थोड्या वेळाने बटाट्याचे काप काढून घ्या. उकडलेल्या बटाट्याचा वापर करणं फायदेशील ठरेल.

चण्याची डाळ –

भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास यामध्ये चण्याची डाळ टाकणे फायदेशीर ठरत. त्यासाठी २-३ चमचे चण्याची डाळ पाण्यात भिजत घालावी.

दही –

एखादा पदार्थ खारट झाल्यास त्यामध्ये शक्य असल्यास तुम्ही दह्याचा वापर करू शकतात. यामध्ये २ ते ३ चमचे दही घाला. त्यामुळे जास्त झालेल्या मीठाचं प्रमाण संतुलित होण्यात मदत होते.

ब्रेडचे तुकडे –

रस्सा भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यात ब्रेडचे तुकडे घालणे जास्त फायदेशीर ठरतं. ब्रेड भाजीतील जास्त मीठ शोषून घेतो. त्यामुळे खारटपणा कमी होण्यास मदत होते.

काजू –

पदार्थामध्ये खारटपणा दूर करण्यासाठी काजूची पेस्ट देखील फायदेशीर ठरते. त्यामुळे भाजीला वेगळी चव मिळते आणि मीठाचं प्रमाणही कमी होईल.

पीठ –

एखाद्या पदार्थांमधील मीठाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही पीठाचा वापर देखील करू शकता. त्यामध्ये पदार्थाचा खारटपणा कमी होतो. यासाठी पीठाचे २ ते ३ लहान गोळे करून पदार्थामध्ये टाका आणि काही वेळाने पीठाचे गोळे काढून घ्या. पीठ हे जास्त मीठ शोषून घेईल.

हे ही वाचा: 

ASIA CUP 2023, आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग ११

Sharad Pawar आज जालन्यातील मराठा आंदोलकांची घेणार भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version