चेहऱ्यावर झटपट नैसर्गिक ग्लो हवा असेल तर आहारात ‘या’ पेयांचा समावेश करा

चेहऱ्यावर झटपट नैसर्गिक ग्लो हवा असेल तर आहारात ‘या’ पेयांचा समावेश करा

हिवाळा ऋतू चालू झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेमध्ये काहींना काही बदल जाणवू लागतात. त्वचा कोरडी व्हायला सुरुवात होते. थंड हवेमुळे आपल्या त्वचेतील आर्द्रता शोषून घेते. आपली त्वचा निर्जीव आणि कोरडी पडू लागते. हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या भाज्या आणि फळे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. म्हणूनच जरा तुम्हाला तुमच्या त्वचेवर चमक आणायची असेल तर आम्ही तुम्हाला काही आरोग्यदायक पेय सांगणार आहोत.

काकडीचा रस :

काकडी ही भाजी प्रत्येक ऋतूमध्ये उपलब्ध असते. त्याच्यामध्ये मोठया प्रमाणावर पाणी असते. ज्यामुळे तुम्ही त्वचा हायड्रेट राहते. काकडीचा रस प्यायल्याने त्वचेमध्ये कोरडेपणा येत नाही. सेच त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होत नाही, त्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवत नाही.

बीटचा रस:

बीट ही भाजी हिवाळ्यामध्ये सर्वात आरोग्यदायी भाज्यांपैकी एक आहे. आरोग्याच्या दृष्टीने बीटचे अनेक फायदे आहेत. ब्लड प्रेशर कमी करण्याबरोबरच ते स्टॅमिना देखील वाढवते. बीटचा रस प्यायल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहते. तसेच तुमच्या त्वचेसाठी बीटचे अनेक फायदे आहेत. बीट खाल्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकते आणि त्याचा रस रोज प्यायल्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लोदेखील येतो.

टोमॅटोचा रस:

काकडीसोबतच टोमॅटो ही प्रत्येक ऋतूत उपलब्ध असलेली भाजी आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते आणि व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. याच्या वापराने आपल्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. त्याच्या वापरामुळे त्वचा कोरडीही होत नाही आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण होते. त्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकते.

हे ही वाचा:

साऊथ सुपरस्टार महेश बाबू झाला रणबीर कपूरच्या अभिनयाचा चाहता, म्हणाला…

दूध दर निश्चितीमध्ये सरकारने हस्तक्षेप करावा, बाळासाहेब थोरात यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version