Sunday, June 30, 2024

Latest Posts

केस न गळता वजन कमी करायचे असेल तर हे उपाय नक्की करून पाहा

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होत असते.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होत असते. बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल लठ्ठपणा आणि वाढलेले वजन यामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी प्रत्येकजण डाएटिंग आणि व्यायाम करण्याचा पर्याय निवडतात. पण अनेकदा वजन कमी करत असताना केस गळण्याच्या समस्या जाणवू लागतात. पण केस नक्की का गळतात हे तुम्हाला माहित आहे का ? ज्यावेळेस आपण वजन कमी करण्यासाठी डाएट करतो. डाएट फॉलो करत असताना शरीरात पोषक तत्वांची कमतरता कमी होऊ लागते. त्यामुळे केस गळायला सुरुवात होते. हे नेमकं कश्याने होत जाणून घेऊया.

केसांना इजा न करता तुम्ही वजन कमी करू शकता. शरीरातील वजन कमी झाले कि शरीरात अनेक हार्मोनल बदल होण्यास सुरुवात होते. केस मुळापासून कमकुवत होऊ लागतात. शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने, लोह आणि इतर आहारातील फायबर सप्लिमेंट्सच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या वाढू लागते. लाल मांस, मासे आणि बीन्समध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळून येतात. प्रथिने केसांच्या वाढीसाठी मदत करतात. प्रथिने अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. अंडी, पालक, लिंबूवर्गीय फळे, नट, गाजर, एवोकॅडो आणि संपूर्ण धान्य हे निरोगी आहार आहेत, ज्याच्या सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते आणि केसांना गळणे थांबू शकतात. वजन कमी करण्यासाठी, कॅलरी मर्यादित असणे गरजेचे असते. जास्त कॅलरी कमी केल्याने पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊन केस गळू लागतात.

केसांच्या निरोगी वाढीसाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, आयर्न आणि झिंक हे घटक खूप महत्वाचे आहेत. ही जीवनसत्त्व वजन कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे व्हिटॅमिन समृद्ध असलेले डाएट फॉलो करणे गरजेचे असते. जर तुम्हाला केसगळतीपासून सुटका हवी असेल तर हे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

हे ही वाचा:

राम मंदिर उद्घटनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकले म्हणाले, त्याचं पाप नरेंद्र मोदी यांना लागेल…

लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढाईत सामाजिक संघटनांची भूमिका महत्वाची, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss