spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सणासुदीच्या काळात तंदुरुस्त राहायचे असेल तर प्या हे ‘पेय’

सण सूद म्हटल्यावर गोडाचे पदार्थ आले. सण म्हटल्यावर आपला खाण्यापिण्यावर कॉन्ट्रोल (control) नसतो. चविष्ट पदार्थ म्हटल्यावर आपण ओव्हरइटिंग (overeating) करतो. आणि त्यामुळे आपला लठ्ठपणा वाढतो आणि मधुमेह सारखे आजार होतात. ओव्हरइटिंग केल्यास आपल्याला पचनास त्रास होतो. त्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या आजरांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आपण वेगवेगळ्या प्रकारचे “पेय” सेवन केले पाहिजे. ते आरोग्यास चांगले असते.

हे ही वाचा : जाणून घ्या तांब्याच्या भांड्यात साठवलेले किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

 

बीटाचा रस :

बीटामध्ये लोह जास्त प्रमाणात असते, त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होत नाही. बीटामध्ये फायबर देखील असते. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. बीटामध्ये खूप
कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

सफरचंदाचा रस :

 

सफरचंदाचा रस आरोग्यासाठी उपयुक्त असतो. सफरचंदामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. सफरचंदाच्या ज्यूसचे सेवन केल्याने बद्धकोष्ठताच्या समस्या कमी होतात.

गाजराचा रस :

 

गाजराच्या रसाचा वापर मधुमेहाच्या समस्येवरही फायदेशीर ठरू शकतो. गाजराचा रस कमी प्रमाणात प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्यांचा रस :

 

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीन, आणि भरपूर जीवनसत्त्व असतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचा रस पिणे. हिरव्या पालेभाज्यांचा रस सेवन केल्याने वजन नियंत्रणामध्ये राहते. तसेच भाज्यांमध्ये ॲंटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही कारल्याचा रस , कोबीचा रस , पालकाचा रस इत्यादी तुम्ही सेवन करू शकता.

संत्र्याचा रस :

 

संत्र्याच्या रसाचे सेवन केल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो. संत्रयांमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

मोसंबी रस :

 

मोसंबीचा रसाचे सेवन केल्यास पचन समस्या दूर होतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. मोसंबीचा रस नियमित पणे पिल्याने आरोग्य सुधारते आणि निरोगी राहते.

Latest Posts

Don't Miss