spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

इम्यूनिटी मजबूत करायची असेल तर या टिप्स करा फॉलो

आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. रोगप्रतिकार शक्ती मजबूत असल्यास कोणतेही आजार आपल्यापासून दूर राहतात . इम्यूनिटी मजबूत करायची असेल तर छोट्या आजरांपासून दूर राहणे गरजेचे आहे. इम्यूनिटी मजबूत असल्यास आपण कोणत्याही रोगामुळे होणारे जीवाणू, यांच्याशी लढण्याची क्षमता मिळते. तुम्ही बाहेरील पदार्थ खाणे टाळले पाहिजे. जास्त करून घरातील अन्न पदार्थ सेवन केले पाहिजे. नियमितपणे व्यायाम केला पाहिजे यामुळे आपली शरीराची इम्युनिटी मजबूत राहते.

हे ही वाचा : सणासुदीच्या काळात तंदुरुस्त राहायचे असेल तर प्या हे ‘पेय’

 

पपईचा पानांचा रस पिल्याने शरीरातील पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते. पपईची पाने डेंग्यू या आजरांवर खूप उपयुक्त आहेत. तसेच पपईची पाने आरोग्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. त्यामुळे रोज पपईच्या पानांचा रस पिणे.

दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड आढळते. यामध्ये आढळणारे बॅक्टेरिया अन्न पचवण्यास मदत करतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आणि इम्यूनिटी देखील मजबूत करते.

 

डाळिंबमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असते. डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तसेच डाळिंबमध्ये भरपूर प्रमाणात फायबरदेखील असते. रोज सकाळी डाळिंबाचे सेवन करावे.

लसूणमध्ये जास्त प्रमाणात इम्यूनिटी असते आणि लसणाचे सेवन केल्याने शरीरातील इम्यूनिटी मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच लसणाचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. लसणाचा रोज नियमितपणे आहारात वापर करणे. लसूणमध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटिफंगल गुण असतात आणि ते शरीरातील खराब किटाणू आणि टॉक्सिन बाहेर काढतात. तसेच लसूण सर्दी , खोकल्यासाठी देखील चांगला आहे.

बीट नियमितपणे सेवन करणे. बीटाचे सेवन केल्याने शरीरातील रक्तवाढण्यास मदत होते. बीटमध्ये व्हिटॅमिन असते. बीटमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स देखील असते. बीटाचे रोज सकाळी सकाळी सेवन करणे.

हे ही वाचा :

बदलत्या ऋतूमुळे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ‘या’ पदार्थाचे सेवन करा

 

Latest Posts

Don't Miss