Friday, September 27, 2024

Latest Posts

व्यायामादरम्यान हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा आवर्जून

सध्याच्या काळात हृदयविकाराचा झटका (heart attack) येणे हा आजार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वर्षानुवर्षे ही संख्या वाढतच चाली आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनानंतरच्या काळात हृदयविकाराच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आजकाल कमी वयात देखील हृदयविकाराचा झटका येणाचे प्रमाण वाढले आहे. २०१६ ते २०२२ या काळात २० ते ३० वर्ष वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढले आहे.तर काही वेळा जिममध्ये व्यायाम करतानाही हृदयविकाराचा झटका येणाचे प्रमाण वाढले आहे.

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे काही वेळा जागीच मृत्यू देखील होतो. हृदयाच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे हे त्याच्या मागचे मुख्य कारण आहे. अशा वेळी व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. जिम किंवा डान्स करत असताना शरीरातील ऑक्सिजनची मागणी वाढते. ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे त्याचा हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे हृदय वेगाने पंप करू लागते. तसेच नसांमध्ये रक्तपुरवठा वाढल्याने हृदय योग्यरित्या कार्य करू शकत नाही आणि त्यामुळे हृदयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. ५० ते ७० टक्के ब्लॉकेज असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. या कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे.

आजच्या जीवनशैलीचा परिमाण आपल्या शरीरावर अधिक प्रमाणात दिसून येतो. त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयात येऊ शकतो. याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. त्रास जाणवू लागल्यास वेळोवेळी हृदयाची तपासणी करणं गरजेचं आहे. एंन्जिओग्राफी आणि विविध चाचण्यांद्वारे हृदयातील ब्लॉकेजची माहिती आजकाल सहज मिळते. अशा परिस्थितीत जर चाचणीमध्ये ब्लॉकेज आढळले तर व्यायाम करताना काळजी घ्यावी. आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अचानक जड व्यायाम करणे टाळा.नेहमी हलक्या व्यायामाने सुरुवात करा. व्यायामादरम्यान तुम्हाला अस्वस्थता जाणवत असल्यास, वर्कआउट ताबडतोब थांबवा. स्टिरॉइड्स घेऊन जड व्यायाम करणे टाळा. व्यायामा दरम्यान छातीत दुखल्यास हलक्यात घेऊ नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Latest Posts

Don't Miss