हाडांना मजबूत करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा समावेश

हाडांना मजबूत करण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचा समावेश

अनेकांना सांधे दुखीचा त्रास होत असतो. हाडे जेव्हा कमकुवत होतात त्यावेळी सांधे दुखीचा त्रास होतो. हिवाळा आणि पावसाळ्यांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात होतो. एकावेळी असा त्रास होतो की जागेवरून उठायला देखील होत नाही. हाडे दुखणे ही सामान्य बाब नाही. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून हाडांना मजबूत करण्यासाठी काही पदार्थ सांगणार आहोत.

हे ही वाचा : मायोसिटिस म्हणजे काय ? जाणून घ्या लक्षणे…

 

हाडांचा त्रास हा खूप वाईट असतो. यामध्ये काही लोकांना चालता देखील येत नाही. बसताना उठताना देखील त्रास होतो. आजकाल हा त्रास तरुण पिढीमध्ये देखील पाहायला मिळत आहे. अनेक मुले कॉलेज किंवा कामावरून घरी आल्यावर खूप थकल्यासारखे असतात. आणि त्याचे पाय देखील खूप जास्त प्रमाणात दुखतात. आजकालच्या धावपळीच्या जीवनामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागतात. हाडांच्या बळकटी साठी कॅल्शिम खूप महत्वाचे असते.

बीन्स मध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस असते जे हाडे मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. हे हाडे मजबूत करत नाही तर हाडे कमकुवत देखील होऊन देत नाही.

रोज अक्रोडचे सेवन करावे. नियमितपणे अक्रोडाचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते. तसेच अक्रोड मेंदूच्या आणि हृदयाचा आरोग्यसाठी देखील खूप फायदेशीर आहे. अक्रोडाचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात आणि कमकुवत होत नाही.

 

तीळ खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत. तसेच तीळ मध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिम असते. तसेच तीळ मध्ये मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॉपर, झिंक आणि फॉस्फरस देखील असते. हे पोषक घटक हाडांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर पडते. रोज तिळाचे सेवन आवर्जून करा.

रोज सकाळी उठल्यावर दुधाचे सेवन करा. दुधामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिम असते. आणि हाडांन सोबतच आरोग्यासाठी देखील दूध खूप फायदेशीर आहे. तसेच दात मजबूत करण्यासाठी देखील तुम्ही दुधाचे सेवन करू शकता. दुधाचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत होते. आणि दूध हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

रोज पालक या भाजीचे सेवन करणे. यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी मदत होते. पालक मध्ये कॅलशीमचे प्रमाण जास्त असते.

हे ही वाचा : 

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

 

Exit mobile version