स्वयंपाकात गॅसचा जास्त वापर केला जातो ? गॅस वाचविण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

स्वयंपाकात गॅसचा जास्त वापर केला जातो ? गॅस वाचविण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

जेवण बनवण्यासाठी जास्त गॅसचा वापर केला जातो . मात्र गॅसच्या वाढत्या किमतीमुळे लोक त्रस्त झाले आहे . त्याचबरोबर सिलेंडर १० – १५ दिवसात लगेच संपतो. ज्या लोकांच्या घरात गॅसच्या पाईपलाईन असतील तर त्यांना जास्त बिल येत असेल . तसेच स्वयंपाकाचा गॅसशिवाय तासभरही काही काम करणं कठीण आहे. गॅस वेळेच्या आत संपल्यास घरातील लोकांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटतात. आपण काही लहान-सहान चुका करतो, ज्यामुळे गॅस वाया जातो. आज आम्ही तुम्हाला गॅस वाचविण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत .

हे ही वाचा : शांत झोप लागण्यासाठी करा हे उपाय

 

गॅस वाचविण्यासाठी फॉलो करा हे टिप्स –

तांदूळ, डाळ शिजवण्यासाठी तुम्ही प्रेशर कुकरचा वापर करा . याशिवाय तुमच्या वेळेची बचत देखील होईल आणि गॅस ही वाचेल .

जर तुम्ही गॅसवर पाणी तापवत असला तर त्यासाठी तुम्ही गिजरचा वापर करा कारण पाणी गॅसवर तापवल्यावर जास्त प्रमाणात गॅस वापरला जातो .

चणे, राजमा यासारख्या गोष्टी रात्रभर भिजवून ठेवल्याने गॅसचा वापर कमी होतो .

जेवण शिजवताना कढईवर झाकण ठेवणे . त्यामुळे जेवण लवकर शिजते . गॅस देखील वाचतो .

तुमचा गॅस रेंज बर्नर नियमितपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. घाणीने भरलेले गॅस बर्नर इंधनाचा वापर वाढवतात. तुमच्या स्टोव्हची नियमित देखभाल केल्याने तुम्हाला इंधनाची बचत होण्यास मदत होते.

 

जेवण बनवताना गॅस मंद आचेवर ठेवणे .

रुंद भांड्याचा पृष्ठभाग मोठा असल्याने अन्न शिजविण्याचा वेळ कमी होतो. तसेच रुंद भांडी गॅस पूर्णपणे कव्हर करतो . त्यामुळे गॅस व्यवस्थित वापरला जातो आणि गॅसची बचत होते.

फ्रिजमधून काढलेले पदार्थ किंवा बाजारातून आणलेले थंड पदार्थ थेट गॅसवर ठेवून शिजवू नका. या पदार्थांचे तापमान कमी होऊदे. या पदार्थांचे तापमान कमी झाल्यानंतरच अन्न शिजविण्यासाठी ठेवा .

मास, डाळ , भाजी शिजविण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करणे .

हे ही वाचा :

जर तुमचा घसा खवखवत असेल तर करा घरगुती उपाय

 

Exit mobile version