spot_img
Saturday, September 14, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जेवणाबरोबर लगेचच पाणी पिणे योग्य आहे की जेवणानंतर ? जाणून घ्या सविस्तर…

पाणी हे शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. पाण्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनासुद्धा करू शकत नाही. कदाचित माणसे अन्नाशिवाय जिवंत राहू शकतात परंतु पाण्याशिवाय जगणे कठीणं आहे. असे म्हंटले जाते की, पाणी हेच आपले जीवन आहे. पाणी आपल्याला घरगुती वापरापासून ते औद्योगिक क्षेत्रापर्यंत सगळ्याच ठिकाणी गरजेचे असते. पाण्याचा महत्वाचा उपयोग हा पिण्यासाठी केला जातो. परंतु पाणी पिण्याचे अनेक जणांचे नियम ठरलेले असतात.

माणूस बऱ्याचदा बाकीच्या अनेक गोष्टींशिवाय राहू शकतो पण पाण्याशिवाय राहणे हे अशक्य आहे. पाणी पिण्याच्या वेळांबाबत अनेक गैरसमज मांडले जातात. त्यातीलच मुख्य म्हणजे उभे राहून पाणी पिऊ नये असे आवर्जून सांगितले जाते. त्याचबरोबर जेवणाआधी, जेवणासह आणि जेवणानंतर पाणी पिण्याबद्दल प्रत्येकजण काही ना काही तत्वज्ञान सांगत असतात. परंतु याबद्दलचा खरा अर्थ काय आहे हे तत्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जाणून घेऊया सविस्तर.

आजकाल आयुर्वेदाचे महत्व वाढत चालले आहे. बरेच जण आयुर्वेदाला फॉलो करतात आणि आयुर्वेदात प्रत्येक गोष्टी करण्याचे एक मुख्य कारण आणि विशिष्ट पद्धत असते. त्याचबरोबर अन्न खाताना पाणी पिण्याचे साधारण नियम आहेत. खाल्लेल्या अन्नातून शरीराला पोषण मिळत असते. आपण जे अन्न खातो ते पचवण्यासाठी शरीरात अग्नी व ऊर्जा निर्माण होते. त्याला गॅस्ट्रिक फायर असे म्हणतात. म्हणूनच जेव्हा अन्न खाताना आपण पाणी पितो तेव्हा ती ऊर्जा व अग्नी शांत होते. अन्न पचण्यासाठी कष्ट लागतात व ते नीटसे पचत सुद्धा नाही.

जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यामुळे पचनसंस्थेमध्ये अडथळा निर्माण होऊन पचनक्रिया मंदावते. गरज असेल तर एक किंवा दोन घोट प्यावे जास्त पाणी पिऊ नये कारण पचनसंस्था मंदावते. यामुळे जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतरच आणि जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी प्यावे. पर्यायी जेवणाआधी पाणी पिल्यामुळे भूक कमी लागते.

हे ही वाचा:

शनिवारी राहणार महाराष्ट्र बंद; ‘या’ सेवा राहणार बंद आणि ‘या’ सुविधा राहणार चालू जाणूयात काय आहेत त्या..

“Maharashtra Band हा बंद विकृती विरोधी संस्कृती असा आहे”; Uddhav Thackeray यांचे मंतव्य

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss