केस गळतीच्या समस्यासाठी जास्वंदीचे फुल गुणकारी उपाय

जास्वंदीचे फुले दिसायला जितकी सुंदर असतात, तितकीच फायदेशीर सुद्धा आहे.

केस गळतीच्या समस्यासाठी जास्वंदीचे फुल गुणकारी उपाय

जास्वंदीचे फुले दिसायला जितकी सुंदर असतात, तितकीच फायदेशीर सुद्धा आहे. जास्वंदीचा फुलासकट तितकीच त्यांची पाने सुद्धा फायदेशीर आहेत. हे सुंदर फुल जितके सुंदर आहे. तिकतेचं त्यामध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत. केसांच्या समस्यासाठी जास्वंदीचे फुल खूप फायदेशीर आहे. तर चला आज आपण जाणून घेऊया केसासाठी जास्वंदीचा वापर.

हे ही वाचा : हाडे मजबूत होण्यासाठी ‘या’ पदार्थांचा जेवणात करा समावेश

 

जास्वंदीचा वापर –

जास्वंद आणि आवळा केसगळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे.कुटलेली जास्वंदाची फुलं आणि आवळा पावडर पाणी घालून एकत्र करा. हे मिश्रण केसाला मूळापासून लावा व पूर्णपणे सुकल्यानंतर ते धुऊन टाका . ही पद्धत केस गळती पूर्णपणे थांबवून केसांच्या वाढीस मदत होईल.

जर तुम्हाला असे वाटे की तुमचे केस कोरडे झाले आहेत. तर तुम्ही जास्वदींचा वापर करू शकता. जास्वंदीचा वापर केल्याने केस कोरडी होत नाही आणि केसामधील नैसर्गिक ओलावा तसाच टिकून राहतो.

जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल किंवा कोंड्यामुळे तुम्हाला खूप डोक्यात खाज येत असेल तर तुम्ही जास्वंदीचा पानाचा वापर करू शकता. १ चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. आणि जास्वंदीचे पाने बारीक करून घ्या पाने बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये पावकप ताक घाला आणि मेथिचे दाणे मिक्सकरून बारीक पेस्ट करून घ्या आणि ती डोक्याला लावा. मग तुमच्या कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.

जर तुमच्या केसाची चमक गेली असेल आणि ती तुम्हाला ती चमक हवी असेल तर तुम्ही केसांसाठी जास्वंदीचा फुलांचा वापर करू शकता. यासाठी जास्वंदीचे फुले बारीक करून त्यात त्यामध्ये कोरफड जेल मिक्सकरून घेणे आणि केसांना लावणे किमान ४५ मिनिटे तरी लावणे आणि मग पाणीने केस दून घेणे. हे वापरल्यास तुमची केस चमकदार होतील.

हे ही वाचा :

पांढरे तीळ खाण्याचे फायदे

 

Exit mobile version