सकाळी उठून फक्त या गोष्टी करा ब्लड शुगर राहील नियंत्रणात…

सकाळी उठून फक्त या गोष्टी करा ब्लड शुगर राहील नियंत्रणात…

मधुमेह हा आजार लोकांना होणार एक सामान्य आजार झाला आहे . मधुमेहाची लक्षणं दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मधुमेह हा आजार आपल्या भारतात खूप दिसून येतो. रक्तामध्ये साखरेची पातळी वाढली की मधुमेह या सारखे आजर होतात. मधुमेह नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे आहे नाहीतर अनेक आजारांना सामोरे जावं लागत. मधुमेहमुळे आपल्याला सारखी सारखी लघवी होणे, तहान भूक वाढणे, थकवा लागणे, या सारखे लक्षणे दिसून येतात. मधुमेह हा शरीरातील अन्नाशयात तयार होणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर होतो. कारण इन्सुलिनबरोबरच ग्लुकोज प्रत्येक पेशीत जाऊन कामासाठी ऊर्जा निर्माण करते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून ब्लड शुगर कसे नियंत्रणात ठेवायचे या बद्दल सांगणार आहोत.

मधुमेह (Diabetes) हा आजार झाल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर (sugar level) नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कारण रक्तातील साखरेचे (sugar level) प्रमाण वाढल्यास मधुमेह हा आजार होतो. आणि तो आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. सकाळी उठल्यावर काही गोष्टी केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात ठेवता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत त्या.

 

रक्तातील साखर (Blood sugar) नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही रक्तातील साखरेची पातळी (sugar level) प्रत्येक दिवसाला तपासा. यामुळे ब्लड शुगर किती लेव्हल मध्ये आहे हे समजून येते. आणि अनेक गोष्टीची काळजी घ्या.

मधुमेहाच्या रुगणांनी सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण सकाळचा नाश्ता शरीरासाठी खूप महत्वाचा आहे. सकाळचा नाश्ता हा पोट भरून करा, त्यामुळे दिवस भर जास्त प्रमाणात भूक लागणार नाही. म्हणून सकाळचा सकाळचा नाश्ता आवर्जून करा.

शरीरातील मधुमेहाची पातळी वाढली की त्याचा परिणाम आपल्या पायांवर दिसून येतात. पाय जास्त प्रमाणात सुजतात. आणि चालायला देखील होत नाही. म्हणून मधुमेह असल्यास पायांवर लक्ष देणे गरजेचे आहे.

मधुमेह असल्यास नियमित पणे व्यायाम आणि योगासने करा. व्यायाम मुळे शरीराला ऊर्जा मिळते. आणि शरीर फिट आणि फाईन राहते. नियमित पणे व्यायाम आणि योगासने केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

हे ही वाचा:

आज राज्यात हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, चार जणांचा मृत्यू

रक्तातील साखर संतुलित करण्यापासून ते पचनशक्ती वाढवण्यापर्यंत: हिबिस्कस कोम्बुचाचे अनेक फायदे जाणून घ्या

 

Exit mobile version