spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जाणून घ्या, लहान बालकांविषयीचे काही टिप्स…

जे आई वडील जानता, कि हे लहानपणातील वय आपल्या बाळाच्या वाढीचे महत्वपूर्ण वय आहे, असे सर्वच आई-वडील आपल्या बालकांच्या पालनपोषणात कोणतीही कसर ठेवत नाहीत.

जे आई वडील जानता, कि हे लहानपणातील वय आपल्या बाळाच्या वाढीचे महत्वपूर्ण वय आहे, असे सर्वच आई-वडील आपल्या बालकांच्या पालनपोषणात कोणतीही कसर ठेवत नाहीत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा आहार, देखरेख व पोषक वातावरण आदी महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मा‍त्र या व्यतिरिक्त बाळ तंदुरूस्त राहावे म्हणून बेबी मसाज लाभदायी असतो. मसाजमुळे मुलांची हाडे तंदरूस्त होतात. शिवाय मुलाच्या बुद्धिलाही चालना मिळत असते. लहान मुलाच्या मसाजचा भारतीय आयुर्वेदातही उल्लेख आढळतो.

नवजात शिशूची त्वचा नाजूक असते. अशा वेळी बाळाच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. आपल्या बाळाची तेलमालिश कशी करावी, नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी आणि त्याचे काय फायदे आहेत, याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

  • बाळाला रोज आंघोळ घातली पाहिजे. आंघोळ घालताना बाळाच्या अंगाला तेल लावायला हरकत नाही पण नाकात, कानात, गुदद्वारात तेल सोडणे चुकीचे आहे. आंघोळ घालताना खूप गरम पाणी वापरू नये. त्याला सहन होईल असे कोमट पाणी वापरावे.
  • आपल्या बाळाला अंघोळ घालताना दूध व बेसन या मिश्रणाचा साबणाऐवजी कधीतरी उपयोग करू शकता. तसेच सहा महिन्यांपेक्षा लहान बाळांना साबणाच्या वडीने चोळून आंघोळ घालू नका. साबण आपल्या हाताला लावून मग बाळाला आंघोळ घाला. त्यामुळे बाळाच्या त्वचेवर साबणाच्या चोळण्याचे निशाण पडणार नाहीत.

  • बाळाच्या शरीराच्या मालिशसाठी बेसन आणि दूधक्रीम मध्ये चिमुटभर हळद घेवून त्या मिश्रणाचा वापर करायला पाहिजे व हलक्या हाताने हळू हळू बाळाच्या शरीरावर लावावे.
  • बाळाच्या त्वचेला खूप जास्त चोळण्याची गरज नसते. कारण, त्यांच्या त्वचेवर धूळ जमा होत नाही. तुम्ही फक्त मालिश करा आणि आंघोळ घाला.
  • बदामाचे तेल थोड गरम करून थंड करा नंतर बाळाच्या शरीराची मालिश करा.
  • गव्हाच्या पिठात एक मोठा चमचा मोहरी तेल घेवून अंगावरील केसांच्या विरुद्ध दिशेने रगडून चांगली मसाज केल्यास अंगावरील केस निघून जातात. केस कमी करण्याचा एक उत्तम व प्राकृतिक उपाय आहे.
  • एक मुठभर कडूनिंबाची पान आणि तुळस पाने घेवून पाण्यात उकडून त्याने बाळाच्या डोक्याच्या केसांना धुवावे यामुळे डोक्यात कोंडा होणार नाहीत.
  • बाळाची टाळू लवकर भरून यावी म्हणून टाळूवर तेल ओतून बोटांनी ते तेल टाळूवर जिरवण्याची प्रथा आहे ती चुकीची आहे. तसे करण्याचे काहीच कारण नाही. कारण मेंदुची वाढ पूर्ण झाल्यावर मग टाळूची हाडे आपोआपच जुळून येतात. साधारणपणे एक ते दीड वर्षात ती जुळून येतात. ती जुळून आली नाही, खोल गेली किंवा टाळूला सूज आली तर डॉक्टरांना त्वरित दाखवावे.
  • आंघोळीनंतर बाळाच्‍या त्‍वचेला अत्‍यंत सॉफ्ट आणि स्‍वच्‍छ टॉवेलने पुसावे. तसेच बाळाचे कपडे व लंगोट गरम पाण्यात भिजवून नंतर धुवून कडक होईपर्यंत उन्हात ठेवल्यास त्यातील किटाणू नष्ट होतात. लंगोट धुतल्यानंतर त्याची कडक प्रेस करून स्वच्छं ठिकाणी ठेवल्यास त्या रोगमुक्त होतात.
  • मशीनमध्ये जर लंगोट व बाळाचे कपडे धूत असाल, तर स्वच्छ व गरम पाण्यात भिजवावे नंतर मशीनचे तापमान वाढवून धुवून कडक उन्हात सुकवावे.
  • बाळाची त्‍वचा अतिशय नाजुक असते. यामुळे जास्‍तीच्‍या माइश्‍चरपासून बचाव करण्‍यासाठी बेबी पावडरचा वापर करणे महत्‍त्‍वाचे असते. यामुळे बाळाची त्वचा मुलायम राहते.

हे ही वाचा : सुंदर आणि नाजूक डोळ्यांसाठी काजळ लावण्याच्या पध्दती

जाणून घ्या बेबी मसाजचे फायदे :-

  • मसाजमुळे मुलाचे वजन वाढण्यास मदत होते.
  • दिवसभरातून किमान एक वेळा मसाज केल्याने मुलाचे स्नायू बळकट होतात.
  • मसाजमुळे मुलामधील एकाग्रता वाढते.
  • मुलाच्या पोट व पचनक्रियेसंबंधी व्याधी दूर होतात.
  • मसाजमुळे मुले व आई यांच्यात घनिष्टता वाढीस लागते.
  • मसाजमुळे मुलांना शांत झोप लागत असते.
  • मसाजमुळे मुलाचा शारीरिक व मानसिक विकास होत असतो.

हे ही वाचा :

घरातल्या खर्चांवर करा नियंत्रण

जाणून घ्या अंजीर खाण्याचे फायदे..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss