जाणून घ्या अश्वगंधाचे फायदे

आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती जास्त चांगली करण्यासाठी आणि झोप चांगली लागण्यासाठी अश्वगंधा मदत करते.

जाणून घ्या अश्वगंधाचे फायदे

अश्वगंधा एक आयुर्वेदिक औषध आहे. अश्वगंधा आहारासाठी आणि त्वचेसाठीही चांगली आहे.अश्वगंधामुळे मेंदूचा ताण कमी होतो.आणि प्रतिकारशक्ती वाढते.अश्वगंधा ही सौंदर्यासाठी उतम आहे.अश्वगंधामुळे ताणतणाव कमी करण्यास मदत होते. अश्वगंधा मुळे कार्यक्षमता वाढू शकते, ग्लुकोजचे चयापचय सुधारू शकते. पण अश्वगंधेचा वापर कमी प्रमाणात करणे जास्त प्रमाणात केल्याने शरीरावर वेगवेगळे परिणाम होण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती जास्त चांगली करण्यासाठी आणि झोप चांगली लागण्यासाठी अश्वगंधा मदत करते.

ताणतणाव – अश्वगंधामुळे ताणतणाव कमी होतो.त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते. हे त्वचेतील कोलेजन वाढवते, ज्यामुळे त्वचा चमकदार राहते, जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर तुम्ही अश्वगंधा पावडरचा फेस पॅक देखील वापरू शकता.

केस – अश्वगंधा ही औषधी वनस्पती केसांनासाठीही उपयुक्त आहे.अश्वगंधामुळे केस लांब आणि केसगळती कमी होते.

सूरकुत्या– अश्वगंधामुळे त्वचेचे आजार बरे होण्यास मदत होते. यामुळे सुरकुत्या तर कमी होतातच,आणि त्वचा सुंदर दिसू लागते.

रक्त – अश्वगंध या वनस्पती मुळे रक्तातील साखरेच प्रमाण कमी करण्यास मदत होते आणि मधुमेहही प्रमाणात रहाते.

थायरॉईड – हायपोथायरॉईडीसीमच्या रोगामध्ये अश्वगंधाचा उपयोग थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करण्याकरिता केला जातो.

हाडाची मजबुती – अश्वगंधा शरीराच्या स्नायूना बळकट करण्याचे कार्य देखील करते. अश्वगंधा खाल्याने शरीराच्या खालील अवयांची कार्यशमता वाढते.

पांढरे केस – केस पांढरे असल्यामुळे कोणालाच आवडत नाही. वयाच्या अगोदर केस पांढरी झाली की ती कोणालाच आवडत नाही. केस पांढरे होऊ नये. म्हणून अश्वगंधा लावली जाते.

कॅन्सर – अश्वगंधा ही आयुर्वेदिक औषधी कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव करत असते. जर कोणालाही कॅन्सरचा धोका असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने अश्वगंधाचे सेवन करावे.

डोळ्यांचे आजार – मोतीबिंदू असल्यास अश्वगंधा वनस्पती कमी करण्यास मदत करते.

वजनवाढ – आजकाल वजनामध्ये वाढ हा सर्वात मोठा आजार झाला आहे.आपण कधीही कोणत्याही वेळी खातो त्यामुळे वजनवाढ वर लक्ष राहत नाही अश्वगंधा चे सेवन केल्यास भुकेवर नियंत्रण राहते. आणि वजन कमी करण्यास मदत होते.

हे ही वाचा:

दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा हा ‘शो’ले आहे, म्हणत श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांवर केला पलटवार

सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिका करणार २५० कोटींचा खर्च

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version