जीवनातील व्यायामाचे महत्व जाणून घ्या

जीवनशैलीसाठी प्रत्येकाने दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे तरी काढायलाच हवीत.

जीवनातील व्यायामाचे महत्व जाणून घ्या

जीवनशैलीसाठी प्रत्येकाने दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे तरी काढायलाच हवीत. स्वस्थ व्यक्तीने स्वतःच्या जीवनाची काळजी घ्यावी आणि निरोगी जीवनासाठी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो. व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे माणूस आनंदी रहातो. व्यायामामुळे आपली मानसिक तसेच शारीरिक शक्ती वाढते. लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा ही सध्याची गंभीर जागतिक समस्या आहे आणि व्यायामामुळे ही समस्या कमी होण्यास देखील मदत होते. व्यायामाचे माणसाच्या वैयक्तिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा सर्वच जीवनावर चांगले परिणाम होतात. व्यायामामुळे तुम्ही सदैव आनंदी आणि उत्साही राहता. ज्यामुळे तुमचे सामाजिक जीवन अधिक समृद्ध होते. म्हणून रोज नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.

हे ही वाचा :सतत तहान लागणे शरीरासाठी हानिकारक, जाणून घ्या लक्षणे

 

व्यायामाचे फायदे –

नियमित व्यायाम केवळ शरीरालाच नव्हे तर मन निरोगी ठेवण्यासाठी ही उपयुक्त ठरतो. तणाव, डोकेदुखी आणि नैराश्य यासारख्या अनेक समस्या नियमित व्यायामाच्या मदतीने कमी किंवा बरे होऊ शकतात.

आजकाल जास्त उशिरा काम करणे,उशिरा झोपणे, रात्री उशीरापर्यंत टीव्ही अथवा मोबाईल पाहणे, उशीरा जेवणे यामुळे झोपेचे चक्र बिघडते. अनेकांना रात्री झोप न लागणे अथवा झोपमोड होण्याचा त्रास जाणवतो. मात्र जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमच्या झोपेवर कोणताही परिणाम होत नाही. व्यायामामुळे तुम्हाला चांगला आराम मिळतो आणि शांत झोप लागते.

 

नियमित व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. रक्तप्रवाहामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते.

मेंदूचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम नियमित करणे गरजेचे आहे. तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ऑक्सिजनची पातळी वाढते. ज्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि तुमची विचारशक्ती, स्मरणशक्ती, निर्णय शक्ती, आकलन शक्ती वाढू लागते.

व्यायाम केल्याने वजन नियंत्रित राहते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायलाच हवा, त्यासोबतच डायट फॉलो केले पाहिजे. आणि वेळोवेळी आहार घेतला पाहिजे.

हे ही वाचा :

वारंवार लघवी का होते ? त्यासाठी घरगुती उपाय

 

Exit mobile version