आयुर्वेदिक त्रिफळाचे औषधी फायदे घ्या जाणून

आपल्या रोजच्या जीवनात अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात आहे. औषधी वनस्पतीचा उपयोग केल्याने आपल्या शरीराला कसलीही इजा होत नाही व शरीराला क्षणात आराम मिळतो. असेच एक आयुर्वेदिक औषध म्हणजे त्रिफळा ज्याचे अनेक फायदे आहेत.

आयुर्वेदिक त्रिफळाचे औषधी फायदे घ्या जाणून

आपल्या रोजच्या जीवनात अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात आहे. औषधी वनस्पतीचा उपयोग केल्याने आपल्या शरीराला कसलीही इजा होत नाही व शरीराला क्षणात आराम मिळतो. असेच एक आयुर्वेदिक औषध म्हणजे त्रिफळा ज्याचे अनेक फायदे आहेत. त्रिफळामध्ये अँटी-बॅक्टेरियल (anti-bacterial), अँटी-व्हायरल (anti-viral) आणि अँटी-पायरेटिक (anti-pyretic) गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या शरीराला कसलेही संसर्गजन्य रोग होत नाहीत.

त्रिफळाचे फायदे (triphala remedy for all health problems)

त्रिफळा हे औषध आवळा (amla), बहेरा (bahera) आणि हरड (harad) यापासून बनवले जाते, म्हणून याला त्रिफळा असे म्हणतात. त्याचा उपयोग बारीक पावडर करून केला जातो,यामुळे अनेक रोगांपासून आपला बचाव होतो. हे तिन्ही फळ एकत्र मिसळल्याने त्यांची शक्ती त्रिगुणी होते.तसेच शतकानुशतके त्रिफळा चूर्ण पोटाचे आजार आणि विविध आजारांपासून मुक्त होण्यासाठी वापरले जाते.

पचन संस्था (digestive system) सुधारते

ज्यांना सारखे अपचन होत असते त्या लोकांसाठी त्रिफळा हा उत्तम उपाय आहे. त्रिफळामुळे पचन संस्था सुधारते तसेच पोटाचे बरेच रोग बरे होतात. हे बद्धकोष्ठता आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारख्या समस्या दूर करते.

डोळ्यांसाठी गुणकारी (good for eyes)

त्रिफळा डोळ्यांसाठी आयुर्वेदिक औषध म्हणून काम करते. त्रिफळा डोळ्याच्या लेन्समध्ये असलेले ग्लूटाथिओन नावाचे अँटीऑक्सिडंट वाढवते. जर तुम्हाला लाल डोळे किंवा मोतीबिंदू सारख्या समस्या असतील तर तुम्ही त्रिफळा चूर्ण सेवन करून या समस्यांपासून दूर राहू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्रिफळा चूर्ण रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी त्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. धुण्यापूर्वी पाणी गाळून घ्या. जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून घाण स्त्राव निघत असेल तर तोही त्रिफळा बरा करतो.

वजन कमी होते( weight loss)

त्रिफळा विविध स्वरूपाने सतत वापरल्यास शरीरातील फॅट कमी होते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल तर गरम पाण्यात त्रिफळा मिसळून व्यायाम आणि योगासने केल्यानंतर दिवसातून दोन ते तीन वेळा प्या.

हे ही वाचा:

Budget 2023 – महत्त्वाच्या घोषणा घ्या जाणून

उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ पुन्हा घसरली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version