Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौणिमेदिवशी मसाला दूध पिणे ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर

Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौणिमेदिवशी मसाला दूध पिणे ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर

मराठी कॅलेंडरनुसार अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. कोजागिरीला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असतो. ज्यामुळे रात्रीच्या वेळी चंद्राचे संपूर्ण रूप पाहाता येतं. या दिवशी पडणारा चंद्राचा प्रकाश आरोग्यासाठी उत्तम असतो असं म्हणतात. यासाठीच रात्रीच्यावेळी चंद्राचे दर्शन घेत रात्र जागवण्याची पद्धत आहे. तसेच या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा देखील केली जाते. या असेही मानले जाते कि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवी भ्रमंतीस निघते त्यामुळे रांगोळीची सजावट आणि दिव्यांची आरास करून लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. या निमित्ताने घाईगडबडीच्या काळातही आजूबाजूचे लोक एकत्र येतात. मित्रमंडळी अथवा शेजारी एकत्र येऊन कोजागिरी साजरी करतात. लक्ष्मी मातेला मसाले दूधाचा नैवेद्य दाखवला जातो. या दूधात चंद्राचे दर्शन घेतले जाते. शिवाय निसर्गाने दिलेल्या अन्नधान्य आणि समृद्धीबाबत त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. यासाठी कोजागिरीला एक अनन्य साधारण महत्त्व आहे तसेच यादिवशी मसाले दूध पिणे देखील आरोग्यासाठी तेवढेच फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे जाणून घेऊया मसाला दुधाचे आरोग्यदायी फायदे:

मसाला दूध पिण्याचे फायदे

कोजागिरीला चंद्रप्रकाशातील दूध पिणं शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. कोजागिरीला आटीव मसाले दूध पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. या काळात पावसाळा संपून थंडीला सुरूवात होत असते. वातावरणात होणाऱ्या बदलांचा शरीरावर परिणाम होत असतो. म्हणूनच आजारपणांपासून दूर राहण्यासाठी मसाले दूध पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं.

कोजागिरीची रात्र जागवण्यासाठी उशीरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री उशीरा झोपण्याचा प्रयत्न केल्यास अनेकांना झोप लागत नाही. कारण त्यांची नेहमीची वेळ बदललेली असते. मात्र जर तुम्ही कोजागिरीला रात्री झोपण्यापूर्वी मसाले दूध प्यायला तर तुम्हाला शांत झोप लागू शकते. शिवाय रोज रात्री झोपताना हळदीचे अथवा मसाला दूध पिण्याने नक्कीच चांगली झोप लागते.

रात्री झोपताना हळदीचे दूध अथवा मसाले दूध पिणे वजन कमी करण्यासाठी फायद्याचे आहे. कारण रात्री झोपताना दूध पिण्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर भुक लागत नाही. ज्यामुळे तुम्ही चुकीचे पदार्थ कमी प्रमाणात खाता.

दूधात कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते. कॅल्शियम तुमच्या दात आणि हाडांच्या मजबूतीसाठी गरजेचे असते. जर तुम्हाला हाडांच्या अथवा दातांच्या समस्या वारंवार होत असतील तर आहारात दूधाचा वापर जरूर करा. कोजागिरीच्या रात्री मसालेदूध यासाठीच पिणे फायदेशीर ठरू शकते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची गरज भरून निघते.

कोजागिरीच्या रात्री आजूबाजूचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि उत्साही असते. अशावेळी चंद्रप्रकाशातील मसाले दूधाचा नैवेद्य घेतलेल्यामुळे तुमचे मन प्रसन्न होते. मानसिक ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी कोजागिरीला मसालेदूध जरूर प्या.

हे ही वाचा:

Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौणिमेनिमित्त अशा सोप्या पद्धतीने बनवा पारंपरिक मसाले दूध

Sharad Purnima 2022: आयुर्वेदानुसार शरद पौर्णिमेला चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर ठरू शकते आयोग्यासाठी उपयोगी, जाणून घ्या कशी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version