घाम न आल्याने आरोग्यावर होतील घातक परिणाम जाणून घ्या कारणे

घाम न आल्याने आरोग्यावर होतील घातक परिणाम जाणून घ्या कारणे

ऋतू कोणते पण असो घाम येणे हे साहजिक असते. घामामुळे आपल्या शरीरातील तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. जर तुम्हाला घाम कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात येत असेल किंवा तुम्हाला घामच येत नसेल तर ते तुमच्या आरोग्यास घातक ठरू शकते. तर चला जाणून घेऊया घाम न येण्याची कारणे.

हे ही वाचा : तेलकट चेहऱ्यापासून सुटका हवीय? तर करा हे घरगुती उपाय

 

याचा परिणाम हायपरहाइड्रोसिस म्हणून जातो. ज्याचे करणे म्हणजे घाम येणे किंवा खूप कमी घाम येणे. त्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या काही भागांवर किंवा संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. जेव्हा शरीर पुरेसा घाम काढू शकत नाही, तेव्हा शरीर जास्त गरम होते, ज्यामुळे उष्माघात होऊ शकतो.

ज्या लोकांना घाम येत नाही, त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित नसते. त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. या समस्येमुळे मेंदूसह शरीराच्या अनेक भागांना इजा होऊ शकते.

शरीरात पाण्याची कमतरता असल्याने देखील घाम न येण्याचे कारण असू शकते.

 

जर तुम्हाला त्वचेचा काही समस्या असतील तर तुम्हाला घाम न येण्याची शक्यता असू शकते.

ज्या लोकांना व्यायाम करून पण घाम येत नसेल तर त्यांना हृदयविकाराचा आजरा असू शकतो.

ज्या लोकांना जास्त मेहनत करून पण घाम येत नसेल तर स्ट्रोकचा धोका असू शकतो .

घाम न आल्यास चक्कर येणे.

घाम कमी प्रमाणात येत असेल तर स्नायू दुखणे असे लक्षणे दिसू शकतात.

ब्लड प्रेशर आणि अंतर्गत क्रियांना नियंत्रण करणाऱ्या नसांना जर इजा झाली असेल तर त्याने एनहायड्रोसिस म्हणजे घाम न येण्याची लक्षण असू शकते.

हे ही वाचा :

हिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

 

Exit mobile version