spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जाणून घ्या नाताळ सणाचा इतिहास

प्रत्येक वर्षी नाताळ हा सण २५ डिसेंबर रोजी असतो.

प्रत्येक वर्षी नाताळ हा सण २५ डिसेंबर रोजी असतो. येशू ख्रिस्ताच्या वाढदिवशी ख्रिसमस डे साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला आहे. त्यांच्या आईचे नाव मारिया होते आणि वडिलांचे नाव योसेफ होते. या दिवशी येशू ख्रिस्ताना मानणारे सर्व लोक त्यांची प्रार्थना करतात. चर्च सजवला जातो. विविध समारंभांचे आयोजन देखील केले जाते. नाताळ हा शब्द लॅटिन भाषेचा नातूय या शब्दापासून तयार झाला असून,त्याच्या अर्थ जन्म असा होतो. इंग्रजी भाषेत त्याला ख्रिसमस असे म्हणतात. येशु ख्रिस्ताचा जन्म जगाचा इतिहासातील सर्वात मोठी ब्राह्मणडनीय घटना होती.

ख्रिसमस डे या सणामध्ये ख्रिसमस ट्रीला खूप महत्त्व असते, त्यामागील एक आख्यायिका देखील सांगितली जाते, त्या दिवशी या झाडाची सजावट कशी सुरू झाली.ख्रिसमसच्या दिवशी सदाहरित वृक्ष सजवून उत्सव साजरा केला जातो, ही परंपरा जर्मनीपासून सुरू झाली, ज्यामध्ये एका आजारी मुलास संतुष्ट करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सदाहरित वृक्ष सुंदरपणे तयार केला आणि त्याला एक भेट दिली याशिवाय असेही म्हटले जाते की, जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा सर्व देवतांनी आनंद व्यक्त करण्यासाठी सदाहरित वृक्ष सजविला, तेव्हापासून हे झाड ख्रिसमसच्या झाडाचे प्रतीक मानले गेले आणि ही परंपरा लोकप्रिय झाली.

या दिवसात सांताक्लॉजचे महत्त्व आहे . बरेच लोक सांताक्लॉजला येशू ख्रिस्ताचा पिता मानतात. तसेच, बर्‍याच कथांनुसार, चौथ्या शतकात तुर्कस्तानमधील एका शहरात बिशप सेंट निकोलस नावाची व्यक्ती असायची, ज्याच्या नंतर सांता क्लॉजची परंपरा सुरू झाली. हे संत गरीब मुलांना भेटवस्तू वाटप करत असत.मुलांमध्ये असा विश्वास आहे की सांता त्यांच्यासाठी भेटवस्तू, चॉकलेट आणि खेळणी वाटप करतो.

हे ही वाचा:

POLITICS: मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल कधी करणार?, VARSHA GAIKWAD यांचा सवाल

मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री प्रचारासाठी गेले मात्र दुसरे गेलेच नाही – जयंत पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss