हिवाळ्यात सतत घसा खवखवतो,तर जाणुन घ्या या टीप्स

हिवाळा सुरु झाला की अनेक आजार डोक वर काढयला निघतात.त्यात घसा खवखवण हे काही नवीन नाही. हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्या निर्माण होतात.

हिवाळ्यात सतत घसा खवखवतो,तर जाणुन घ्या या टीप्स

हिवाळा सुरु झाला की अनेक आजार डोक वर काढयला निघतात.त्यात घसा खवखवण हे काही नवीन नाही. हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्या निर्माण होतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा ऋतू अनेकदा आव्हानात्मक असतो. या थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, घसा खवखवणे यांसारखे विषाणूजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो. काहींना या ऋतूमध्ये अनेकदा घसा खवखवण्याचा त्रास होतो.अनेक वेळा महागडे अँटीबायोटिक्स आणि कफ सिरप घेऊनही घसा खवखवण्यापासून आराम मिळत नाही. पण, घशातील संसर्ग, ताप आणि सर्दी-खोकला बरा करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत, जे व्हायरल इन्फेक्शनमध्ये खूप फायदेशीर ठरू शकतात.

हळदीचे पाणी

शतकानुशतके हळदीचा उपयोग आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातोय. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे संक्रमण दूर करण्यास मदत करतात. तुम्ही हळद आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता, ज्यामुळे घशातील खवखवण्यापासून लवकर आराम मिळेल.

आलं आणि तुळस

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुळशी आणि आल्याचा चहा खूप फायदेशीर मानला जातो. 4 ते 5 तुळशीची पाने थोडे आलं घालून उकळा. जेव्हा अर्धे पाणी शिल्लक असेल तेव्हा तुम्ही त्यात मध घालू शकता. हे प्यायल्याने खोकल्याची समस्या दूर होते. आलं आणि तुळस या दोन्हीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात.

मध आणि दालचिनी

आयुर्वेदात दालचिनी आणि मध औषधी म्हणून वापरले गेले आहेत. घसादुखीपासून मुक्त होण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. दालचिनी पावडर अर्धे पाणी असेपर्यंत उकळवा. यानंतर गाळून मध मिसळा. हे प्यायल्याने घशाचा जडपणा आणि दुखणे कमी होते.

काळी मिरी आणि मध

काळी मिरी आणि मध देखील घसादुखी आणि खोकल्यामध्ये खूप फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संक्रमण दूर करण्यात मदत करतात.हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुम्ही जर या घरगुती पदार्थांचा वापर केला तर तुम्हाला घसादुखीच्या खवखवण्यापासून आराम मिळेल. तसेच, या गोष्टींचा दुष्परिणामही होत नाही. त्यामुळे तुम्ही ते सहज घेऊ शकता. 

हे ही वाचा:

Christmas 2023, ख्रिसमसच्या दिवशी ‘Christmas Tree’ का सजवला जातो?

 गौतम नवलखा यांना नक्षलवाद प्रकरणी जामीन मंजूर झाला 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version