दिवाळी जवळ येतेय…अशी करा प्रत्येक दिवसाची तयारी

दिवाळी म्हटलं की, घराची साफसफाई करण्यापासून ते घरी पाहुण्यांचं आमंत्रण करण्यापर्यंत अशी अनेक कामं असतात.सध्या सर्वत्र दिवाळीचे वारे वाहू लागले आहेत.

दिवाळी जवळ येतेय…अशी करा प्रत्येक दिवसाची तयारी

दिवाळी म्हटलं की, घराची साफसफाई करण्यापासून ते घरी पाहुण्यांचं आमंत्रण करण्यापर्यंत अशी अनेक कामं असतात.सध्या सर्वत्र दिवाळीचे वारे वाहू लागले आहेत.दिवाळी हा दिव्यांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे.  दिवाळी म्हटलं की, घराची साफसफाई करण्यापासून ते दिवाळीचा फराळ बनवण्या पर्यंत अशी अनेक कामं असतात.येत्या 12 नोव्हेंबरपासून दिवाळी सर्वत्र साजरी केली जाणार आहे. या दरम्यान धनत्रयोदशी, वसुबारस, लक्ष्मीपूजनपासून ते भाऊबीजपर्यंत अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दिवाळी म्हटलं की, घराची साफसफाई करण्यापासून ते घरी पाहुण्यांचं आमंत्रण करण्यापर्यंत अशी अनेक कामं असतात. यासाठीच आत्तापासून या पाच दिवसांची तयारी करायला सुरुवात करा. जर तुम्हाला सुद्धा ही दिवाळी कोणत्याही विघ्नाशिवाय उत्साहात साजरी करायची आहे तर आत्तापासूनच दिवाळीच्या तयारीला सुरुवात करा.

घराची साफसफाई करा 

दिवाळीनिमित्त सगळीकडेच घराची साफसफाई केली जाते. अशा वेळी तुमच्या खोल्या, घर, पंखा, कपाटं, स्वयंपाकघर यामध्ये तुम्हाला काही बदलायचं असेल तर आत्ताच तयारी करा. काही नवीन वस्तू घरात आणायची असेल तर त्याची आताच तयारी करा. तसेच, दिवाळीपूर्वी घराची छान साफसफाईदेखील करा.

 सणासुदीचे खाद्यपदार्थ ठरवा

धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, वसुबारस, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज या पाच महत्त्वाच्या दिवसांसाठी घरात कोणते पदार्थ तयार केले जातील याची सर्वात आधी यादी तयारी करा. या पाच दिवसांमध्ये सकाळचा नाश्ता काय असावा? तसेच, दुपारच्या जेवणासाठी कोणती डिश बनवावी? पाहुण्यांना देता येणारे पदार्थ कोणते आणि दिवाळीत रात्रीचा आहार कसा असावा? या संदर्भात आधी नियोजन करा.

स्वयंपाकघरातील वस्तूंची खरेदी

दिवाळीच्या दरम्यान घरात अनेक पंचपक्वान केले जाताता. वेगवेगळ्या मिठाई तसेच फराळ तयार केला जातो. या दरम्यान हे पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या वस्तू आत्तापासूनच ऑर्डर किंवा खरेदी करायला सुरुवात करा. तसेच, फराळासाठी लागणारे साहित्यही तुमच्याकडे अधिक प्रमाणात असतील याची खात्री करा. जेणेकरून नंतर कोणताही गोंधळ होणार नाही.

कपड्यांची खरेदी 

सणासुदीच्या निमित्ताने अनेक लोक नवीन कपड्यांची खरेदी करतात. काही खरेदी स्वत:साठी तर काही नातेवाईकांसाठी अशा वेळी कपडे खरेदी करताना वेळेचं नियोजन करा. तुमच्या बजेटनुसार दिवाळीआधीच कपड्यांची खरेदी केल्याने तुमचा वेळही वाचेल आणि पैशांची बचतही होईल.

सजावटआणिलाईटिंग

दिवाळीनिमित्त घरं आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलं जातं. यासाठी वेळीच आकर्षक लायटिंगची खरेदी करा. जर तुमच्याकडे आधीपासूनच दिवे असतील तर ते नीट चालतात की नाही हे आधीच चेक करायला घ्या. याशिवाय घराच्या सजावटीसाठी योग्य वस्तू खरेदी करा.

हे ही वाचा : 

मराठा आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता

Diwali सणाबद्दल या रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version