केसांसाठी ही ट्रीटमेंट ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या सविस्तर माहिती

आपण अनेकदा ऐकलं असेल केराटिन ट्रीटमेंट (Keratin Treatment) केल्यानंतर केस चांगले होतात.

केसांसाठी ही ट्रीटमेंट ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या सविस्तर माहिती

बदलत्या जीवनशैलीचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर लगेच दिसून येतो. त्यामुळे केसांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक स्त्री आपले केस सॉफ्ट, घनदाट आणि चमकदार (Glow) बनवण्यासाठी आपण काहींना काही उपचार घेत असते. तसेच अनेकदा केसांवर आपण ट्रीटमेंट्स घेतो. या ट्रीटमेंट्समुळे काही वेळा केस खराब होण्याची शक्यता असते. चमकदार, लांब आणि घनदाट केस सगळ्यांचं आवडतात. ताणतणाव, हानिकारक प्रोडक्ट्सचा वापर आणि केसांची काळजी घेण्याच्या अनेक उपचारांमुळे केस गळण्यासारख्या समस्या आपल्याला जाणवू शकतात. चला तर जाणून घेऊयात अश्या कोणत्या ट्रीटमेंट्स केसांसाठी धोकादायक ठरू शकतात.

केराटिन ट्रीटमेंट (Keratin Treatment)

आपण अनेकदा ऐकलं असेल केराटिन ट्रीटमेंट (Keratin Treatment) केल्यानंतर केस चांगले होतात. चांगल्या केसांसाठी अनेकदा स्त्रिया केराटिन ट्रीटमेंट करून घेतात. त्याचा परिणाम जाणून न घेता ही ट्रीटमेंट केली जाते. ही ट्रीटमेंट केल्यानांतर काही काळापर्यंत केस छान आणि चांगले दिसतात. पण काही महिन्यांनंतर केस कमकुवत होण्यास सुरुवात होते. त्यामुळे केस गळण्यास सुरुवात होते.

कांद्याचं तेल (Onion Oil)

कांद्याच्या तेलाचा वापर केसगळती रोखण्यासाठी केला जातो. कोरोना नंतरच्या सौंदर्य उपचारांसाठी कांद्याचा रस वापर जात आहे. या रसामुळे केसांना धोका निर्मण होतो. कांद्याचे तेल एक अँटी-ऑक्सिडेंट आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर असते जे तुमच्या केसांसाठी चांगले असते पण सल्फरमुळे तुमच्या केसांच्या त्वचेत जळजळही होऊ शकते. कांद्याचा रस केस गळतीपासून बचाव करते असे म्हंटले जाते पण त्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

हे ही वाचा: 

शिल्पा शेट्टी कुंद्राचा नवरा राज कुंद्रा करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मनसैनिकानीं पहिला मुलुंड टोलनाका पेटवला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version