spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी,’या’ टिप्स जाणुन घ्या

मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी,’या’ टिप्स जाणुन घ्या

आपण नेहमी आपल्या शारीरिक आरोग्याची सतत जरा जास्तच काळजी घेत असतो. दरम्यान आपले मानसिक आरोग्य आपल्यासाठी आपल्या शारीरिक आरोग्याइतकेच महत्वाचे आहे. त्यामुळे शारीरिक आरोग्य राखण्याइतकेच ते निरोगी ठेवणेही महत्त्वाचे आहे. जर आपण निरोगी दिनचर्या पाळली तर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. आपण आपल्या मेंदूचे कार्य आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींचा समाविष्ट करू शकतो.मानसिक आरोग्य तज्ञ यांची  5 मूलभूत तंत्रे आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य चांगले ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत

  1. पुरेशी झोप घ्या

शांत झोप तुमच्या मनाला सर्वात जास्त विश्रांती देते. डॉक्टरांच्या मते, योग्य वेळी झोपणे आणि योग्य वेळी जागे होणे याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. म्हणून, ठराविक वेळेत झोपण्याचा नित्यक्रम करा आणि 6-8 तासांची झोप घ्या. तुमचे मन जितके शांत असेल तितके चांगले कार्य करत्. यामुळे तुमचे मन केंद्रित होते आणि तुमची एकाग्रता वाढते ज्यामुळे तुम्ही चांगली कामगिरी करता.

  1. दररोज व्यायाम करा

तुम्‍हाला शारिरीक स्‍वस्‍थ ठेवण्‍याबरोबरच दैनंदिन व्‍यायाम केल्‍याने तुम्‍हाला मानसिक दृष्ट्याही मजबूत बनते. दररोज 15 ते 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम केल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे तुम्हाला शांत आणि निरोगी वाटते.

  1. सकस आणि संतुलित आहार घ्या

संतुलित आणि शांत मनासाठी संतुलित आणि सकस आहार आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. जसे तुमचे अन्न आहे, तसे तुमचे मन आहे. आपल्या आहाराचा आपल्या मनावर थेट परिणाम होतो. त्यामुळे सात्विक आणि सकस आहार घ्या. जेणेकरून तुमचे मन शांत आणि तणावमुक्त राहील.

  1. अंमली पदार्थांपासून दूर राहा

डॉक्टरांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सच्या सवयीमुळे तुमच्या मानसिक आरोग्याला सर्वाधिक नुकसान पोहोचते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्यसन टाळावे.

  1. सामाजिक संबंध निर्माण करा

तुम्ही तुमचे मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांच्याशी जितके चांगले संबंध ठेवता तितके तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. म्हणून, लोकांशी बोला आणि आपले विचार मांडा. कारण गोष्टी शेअर केल्याने तुमचे मन हलके होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss