spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिवाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे,जर तुम्ही हिवाळ्यात कमी पाणी पित असालं तर होऊ शकतो गंभीर आजार

हिवाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे,जर तुम्ही हिवाळ्यात कमी पाणी पित असालं तर होऊ शकतो गंभीर आजार

हिवाळा ऋतु सुरु झाला आहे,हळूहळू वातावरणात थंडावा जाणवू लागला आहे. या ऋतूत थंडावा जास्त असल्यामुळे आपला घसा कोरडा होत नसल्यामुळे,आपण या दिवसात खुप कमी प्रमाणात पाणी पित असतोउन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची कमी गरज भासते.  असे अनेकदा आपल्याला वाटते, पण हा आपला गैरसमज आहे. थंड वातावरणामुळे या ऋतूत आपल्याला इतर ऋतूंच्या मानाने कमी तहान लागते. पण, तहान कमी लागत असली तरी उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही भरपूर पाण्याचं सेवन करणं गरजेचं आहे. खरंतर पाण्याची तहान ही प्रत्येक वेळी अनेक गोष्टींवर अवलंबून असते,तर नक्की कोणकोणत्या गोष्टींमुळे पाणी पिणे गरजेचे आहे ते  जाणून घ्या.

 आजूबाजूचे वातावरण

आपली तहान आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी थेट संबंधित असते. कारण उष्ण प्रदेशातील लोकांना जास्त पाण्याची गरज असते. त्या मानाने थंड प्रदेशातील लोकांना कमी पाण्याची गरज भासते. कारण उन्हाळ्यात आपल्या शरीरातून घामाच्या रूपात पाणी बाहेर पडते, त्यामुळे आपण आपले शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पितो, तर हिवाळ्यात जास्त तहान लागत नाही. आपण जर थंड वातावरणा जवळ राहत असू तर या दिवसात त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये पाणी पिण्याचे प्रमाण खुप कमी होत असते.

तुमच्या कामाचा प्रकार

कामाच्या प्रकाराचा तुमच्या तहानवरही परिणाम होतो. जसे की, तुम्ही जास्त शारीरिक काम करत असाल तर तुम्हाला जास्त तहान लागते. पण, जर तुम्ही एसीमध्ये बसून काम करत असाल  तर तुम्हाला बाहेर उन्हात काम करणाऱ्यांपेक्षा तुलनेने कमी तहान लागते. बाहेर जर फिरतीचे काम तुम्ही सतत करत असाल तर तुम्हच्या शरीरात पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात होत असते.

वयाचाही संबंध 

खरंतर, तुमच्या तहानेचा तुमच्या वयाशीदेखील संबंध असतो. म्हणजेच, लहान मुलांना पाण्याची जास्त गरज असते. कारण ते इथे-तिथे धावत असतात. शारीरिक हालचाल जास्त करतात. पण, जसजसं आपलं वय वाढत जातं त्यानुसार पाण्याची गरज तुलनेने कमी भासते.  कारण शरीराची हालचाल वाढत्या वयात खुप कमी होत असते.

कोणताही वैद्यकीय इतिहास

अनेक प्रकारच्या आजारांमध्ये रुग्णांना जास्त पाणी लागते. गरम औषधांच्या सेवनाने पाण्याचे सेवन अचानक वाढते. तर ग्लुकोज ड्रिपवर असलेल्या रुग्णाला पाण्याची कमी तहान लागते. पण, असे असले तरी आपल्या शरीराला दररोज 2 लीटर पाण्याची गरज आवश्यक आहे. तुम्ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुमच्या दिनश्चर्येत ज्यूस, दूध, सूप, चहा, नारळाचे पाणी आणि फळांचं देखील सेवन करू शकता.

शरीरासाठी पाणी का महत्वाचं आहे?

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या, श्वासोच्छवासाच्या समस्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, जर तुम्ही हिवाळ्यात थंड पाणी पिऊ शकत नाही, तर तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता, यासाठी तुम्हाला तुमच्या तहानेच्या क्षमतेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी थर्मॉस सारख्या बाटलीत तुम्ही कोमट पाणी ठेवू शकता.

त्यामुळे हिवाळ्यात ही पाणी पिण्याचे प्रमाण कमी करु नका,तरच तुमचं आरोग्य या थंडीच्या दिवसात ही उत्तम पद्धतीत तुम्हाला साथ देईल.

हे ही वाचा:

विनोदवीर कपिल शर्माच्या नावाने पुण्यातील महिलेला वारंवार फोन

पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss