spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

SIM CARD खरेदी आणि विक्रीच्या नियमांत मोठे बदल

दूरसंचार विभागाने (DEPARTMENT OF TELECOMMUNICATION) सिम कार्डच्या (SIM CARD) खरेदी आणि विक्रीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे सिम कार्ड खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना हे नियम माहिती असले पाहिजेत. जर तुम्हाला नियमांची माहिती नसेल आणि तुमच्याकडून नियमांचे उल्लंघन झाले तर तुम्हाला दंड भरावा लागेल, किंवा तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. केंद्र सरकारला बनावट सिम कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक कमी करायची आहे. त्यामुळे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्यूनिकेशनने नवीन सिम कार्ड नियम काढले आहेत. हे नियम १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार होते, परंतु सरकारकडून २ महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन नियम १ डिसेंबर २०२३ पासून लागू केले जाणार आहेत.

दूरसंचार विभागाच्या (DEPARTMENT OF TELECOMMUNICATION) नवीन नियमांनुसार, सिम कार्ड विकणाऱ्या व्यक्तीला सिम कार्ड खरेदी करणाऱ्या व्यक्तीची योग्य प्रकारे केवायसी (KYC) करावी लागेल. सरकारने सिम कार्ड खरेदी आणि विक्री करणाऱ्यांवर एकाच वेळी जास्त सिम घेण्यावर बंदी घातली आहे. म्हणजे युजर्स एकाच वेळी अनेक सिम कार्ड इश्यू करू शकणार नाहीत. त्याचबरोबर एका आयडीवर मर्यादित संख्येत सिम कार्ड इश्यू केले जातील.

नव्या नियमांनुसार, सर्व सिम विक्रेते म्हणजे पॉईंट ऑफ सेल (PoS) चे ३० नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असणार आहे. ह्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्यास १० लाख रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो. त्याचबरोबर नियमांमध्ये तुरुंवासाचीही तरतूद करण्यात आली आहे. सध्या भारतात सुमारे १० लाख सिम कार्ड विक्रेते आहेत. काही सिम कार्ड विक्रेते चुकीचे व्हेरिफिकेशन आणि पडताळणी न करता नवीन सिम कार्ड विकत आहेत, ज्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. त्यामुळे सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की, जर कोणी बनावट सिम कार्ड विकताना पकडले गेले तर त्या व्यक्तीला ३ वर्षे तुरुंगात जावे लागणार आहे. तसेच त्याचे लायसन्स ब्लॅकलिस्ट केले जाणार आहे.

हे ही वाचा:

बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्याबरोबर प्रिया बापट करणार स्क्रिन शेअर,आगामी प्रोजेक्टची घोषणा

THANE SHRIKANT SHINDE: ग्रंथालयाचे लोकार्पण आणि अनेक विकासकामांचा आढावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss