spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नितळ त्वचेसाठी बनवा फुलांचा फेस पॅक

नितळ आणि सुंदर त्वचा सर्वांनाच हवी असते . सौंदर्याने फुलणारी फुले तुमच्या सौंदर्यात देखील भर घालू शकतात . प्रत्येकाला सणासुदीमध्ये सुंदर दिसायचे असते. उत्तम त्वचेसाठी फुलांचा चांगला वापर करण्यात येतो . काही जण उत्तम त्वचेसाठी महागडे कॉस्मेटिक वस्तू वापरतात . त्यामुळे आपल्या त्वचेचा अधिक समस्या वाढतात . कॉस्मेटिक इंडस्ट्रीलाही या फुलांच्या गुणधर्मांची माहिती आहे, त्यामुळे या फुलांचा उल्लेख अनेक महागड्या स्किन केअर उत्पादनांच्या घटकांमध्ये केला जातो. उत्तम त्वचेसाठी तर या फुलाचा अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो .

हे ही वाचा : घरच्या घरी बनवा त्वचेसाठी कॉफीचा फेस पॅक

 

तुमच्या बागेतील आणि आजूबाजूच्या सुंदर फुलांचे अनेक त्वचेसाठी फायदे आहेत. या फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून आपण सुंदर त्वचेसाठी घरीच फेसपॅक बनवू शकतो. हे फेसपॅक इतर रासायनिक व कृत्रिम स्किनकेअर उत्पादनांपेक्षा त्वचेसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. फुलांपासून बनवलेले फेस पॅक केवळ मुरुम कमी करण्यासाठीच नाही तर तेलकट चेहऱ्यासाठी देखील वापर होतो. फुलांपासून फेस मास्क बनवणे खूप सोपे आहे आणि तुम्ही ते घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

लिली फेस पॅक –

लिली फेस पॅक त्वचेला लावल्यास त्वचेचा समस्या कमी होतात . लिलीच्या पाकळ्यामध्ये मुलतानी माती आणि थोडे गुलाब पाणी मिक्सकरून चेहऱ्याला आणि मानेला लावा . त्यामुळे तुमची त्वचा मऊ होईल आणि सुंदर दिसेल .

 

चमेली फेस पॅक –

चमेलीचे फुल त्वचेसाठी वापरल्यास खूप फायदे होतात . ज्यांची त्वचा कोरडी असेल तर त्यांनी चमेलीच्या फुलांच्या वापर करणे . चमेलीचे फुले बारीक करून त्यामध्ये दूध आणि बेसन मिक्सकरून त्वचेला लावू शकता त्यामुळे तुमचा त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होतो .

गुलाब फेस पॅक –

काहीजण चेहऱ्याला गुलाबाचे पाणी , गुलाब पावडर लावतात . पण तुम्ही चेहऱ्यासाठी गुलाबाचा फेस पॅक देखील बनवून लावू शकता . एका भांड्यात डिस्टिल्ड वॉटर घ्या आणि त्यात ५ ते ६ गुलाबाची पाने टाका. बराच वेळ भिजवल्यानंतर त्यात पाकळ्या बारीक करून त्यात दोन चमचे मध टाका. तयार केलेला मास्क चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या.

हे ही वाचा :

मलेरिया झाल्यास चुकूनही ‘या’ गोष्टी खाऊ नका

 

Latest Posts

Don't Miss