नाश्त्यासाठी बनवा हेल्थी आणि टेस्टी नाचणीचं सूप, वाचा रेसिपी

तुम्हालाही नाश्त्यासाठी काहीतरी हेल्थी आणि टेस्टी खायचे असेल ही रेसिपी नक्की वाचा. अनेकांना नाश्त्याला वेगवेगळ्या प्रकारचे सूप प्यायला आवडते.

नाश्त्यासाठी बनवा हेल्थी आणि टेस्टी नाचणीचं सूप, वाचा रेसिपी

अनेकवेळा आपण सकाळी नाश्त्यासाठी काहीतरी हेल्थी बनविण्याचा विचार करत असतो. सकाळी हेल्थी नाश्ता केल्यास तुमचा संपूर्ण दिवस उत्साहात जातो असे म्हणतात. तुम्हालाही नाश्त्यासाठी काहीतरी हेल्थी आणि टेस्टी खायचे असेल ही रेसिपी नक्की वाचा. अनेकांना नाश्त्याला वेगवेगळ्या प्रकारचे सूप प्यायला आवडते. कोणी टोमॅटोचे सूप करते तर कोणी वेजिटेबल सूप पितात. हेल्थी नाश्ता म्हणून तुम्ही नाचणीच्या सूपची ही रेसिपी नक्की करून बघू शकता. हे सूप अतिशय टेस्टी आणि हेल्थी आहे. तसेच नाचणी आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. वजन कमी करण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी नाचणी खूप फायदेशीर आहे. नाचणीमुळे हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर साखरेची पातळी नियंत्रणात राहते. चला तर मग पाहूया नाचणीचं सूप बनविण्याची लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

२ चमचे तीळ तेल
१ चमचा बारीक चिरलेली लसूण
१ चमचा बारीक चिरलेले आले
१ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१ कप तुमच्या आवडत्या बारीक चिरलेल्या भाज्या
२ चमचे नाचणीचे पीठ
१ टीस्पून काळी मिरी पावडर
१ चमचा स्प्रिंग कांदा बारीक चिरून
१/२ टीस्पून लाल मिरची फ्लेक्स
१/२ लिंबू
पाणी
चवीनुसार मीठ

कृती

प्रथम गॅसवर तवा ठेवून त्यात तिळाचे तेल टाकून गरम करावे. नंतर त्यात सर्व भाज्या टाकाव्यात. थोडा वेळ तळून घ्यावे. यानंतर या भाज्या एका भांड्यात काढून बाजूला ठेवावे. नंतर पॅनमध्ये एक चमचा तिळाचे तेल टाकून त्यात आले, लसूण आणि सेलेरी घालून परतून घ्यावे. यानंतर कढईत नाचणीचे पीठ टाकावे. एक मिनिटापेक्षा कमी परतून झाल्यावर त्यात पाणी घालावे. तसेच त्यात काळी मिरी पावडर टाकावी. आता ते सतत ढवळत राहावे. यानंतर त्यात सर्व मिश्र भाज्या टाकून झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे शिजवावे. या दरम्यान गॅसची आच मंद ठेवावी. आता त्यात स्प्रिंग ओनियन्स घालावे. अशाप्रकारे नाचणी सूप तयार आहे. एका भांड्यात काढा आणि लाल मिरची फ्लेक्स आणि लिंबाचा रस मिक्स करून सर्व्ह करावे.

हे ही वाचा:

नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर अन्…, अमृता फडणवीस यांचा पारंपरिक लुक पहा…

मैद्याचे पदार्थ खाणे टाळा, शरीराला होतील ‘हे’ फायदे

World Photography Day 2023, तुम्हाला माहिती का ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ साजरा करण्यामागचं कारण?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version