ग्लोइंग स्किनसाठी बनवा एलोवेरा फेसपॅक, जाणून घ्या पद्धत

ग्लोइंग स्किनसाठी बनवा एलोवेरा फेसपॅक, जाणून घ्या पद्धत

तुम्हाला जर त्वचेची योग्य प्रमाणे काळजी घ्याची असेल तर त्यासाठी तुम्ही एलोवेरा फेसपॅक (aloe vera face pack) वापरू शकता. तसेच एलोवेरामध्ये एन्टीबॅक्टेरियल असे गुणधर्म देखील आढळून येतात. एलोवेरा चेहऱ्यावर नैसर्गिक रित्या ग्लो आण्याचे काम करतो. सुंदर आणि नितळ त्वचा कोणाला आवडत नाही असे नाही, सर्वाना आवडते. तर आज आम्ही तुम्हाला ग्लोइंग स्किनसाठी (Glowing skin) एलोवेरा फेसपॅक (aloe vera face pack) कशाप्रकारे बनवायचा या बद्दल सांगणार आहोत.

फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीत मसूर डाळ बारीक करून घेणे. त्यामध्ये टोमॅटोचा रस आणि ताज्या एलोवेराचा बारीक किस घालून मिश्रण एकजीव करून घेणे. हा फेसपॅक तुम्ही १० मिनिटे तरी त्वचेला लावून ठेवा आणि त्यानंतर १० मिनिटे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर होते.

तसेच तुम्ही चेहरा सुंदर दिसण्यासाठी एलोवेरा आणि गुलाबजलचा वापर करून देखील तुम्ही फेसपॅक बनवू शकता. या फेसपॅकमुळे त्वचेवरील डाग जाण्यास मदत होईल. फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटी मध्ये एलोवेराचा जेलचा घेणे आणि त्यामध्ये गुलाबजल घालून घ्या आणि मिश्रण चांगले एकत्रित करून घ्या. फेसपॅक बनवून झाल्यानंतर चेहऱ्याला लावून घ्या. असे केल्याने तुमचा चेहरा सुंदर दिसण्यास मदत होईल.

 

जर तुमचा चेहरा तेलकट असेल तर त्यासाठी तुम्ही एलोवेरा आणि मुलतानीचा मातीचा वापर करू शकता. तसेच अनेकांना ही समस्या उद्भवत असते. ज्याची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी हा मुलतानी मातीचा फेसपॅक खूप उत्तम आहे. तसेच कोरफडीचा गर आठवड्यातून एकदातरी त्वचेवर लावा. त्यामुळे त्वचेवरील तेल कमी होते.

एक चमचा एलोवेरा जेल घ्या आणि त्याच प्रमाणात हळद मिक्स करून घ्या. चांगल्या प्रमाणाने मिक्स करून घ्या, हे मिश्रण तयार झाल्यानंतर १० मिनिटे तरी त्वचेला लावून घ्या आणि हा फेसपॅक लावल्यानंतर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

हे ही वाचा :

छोल्यांपासून बनवा चविष्ट मसाले पकोडे

 

Exit mobile version