घरच्या घरी बनवा त्वचेसाठी कॉफीचा फेस पॅक

घरच्या घरी बनवा त्वचेसाठी कॉफीचा फेस पॅक

चमकदार त्वचा सर्वांचा हवी असते . चमकदार त्वचेसाठी लोक वेगवेगळे औषध उपचार करत असतात . तसेच आपण वेगवेगळे फेस पॅक बनवत असतो. तर आज आम्ही तुम्हाला चमकदार त्वचेसाठी कॉफीपासून फेस पॅक कसा बनवायचा हे दाखवणार आहोत . तेलकट चेहऱ्यासाठी आपण कॉफीचा उपयोग करू शकतो . कॉफीपासून तुम्ही वेगवेगळे फेस पॅक बनवू शकतो . कॉफीपासून रक्तभिसरण सुरळीत राहते . चेहऱ्यावरील पिंपल्स देखील कमी होते . चेहऱ्यासाठी कॉफीचा फेस पॅक वापरल्यास त्वचा मऊ होते . कॉफी त्वचेतील घाण साफ करते .

हे ही वाचा : रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करावे

 

कॉफीचा फेस पॅक –

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी चमचाभर कॉफी दिड चमचा खोबरेल तेल आणि यात चमच्यात हळद किंवा दालचिनी घ्या. याचे मिश्रण तयार करा. चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. सातत्याने आठवड्यातून एकदा याचा वापर केला तर याचा फरक तुम्हाला दिसून येईल.

त्वचेचा कोरडेपणा जाण्यासाठी चमचाभर कॉफी १ चमचा ऑलिव्ह ऑइल घ्या. या दोन्हीचे मिश्रण एकत्र करुन चेहऱ्यावर लावा. किंवा तुम्ही १ चमचा कॉफी घेऊन त्यामध्ये थोडे दही मिक्सकरून आणि हे मिश्रण एकत्रित करून घ्या . आणि चेहऱ्यावर लावा . ५ मिनिटे लावल्यानंतर तेव्हा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा .

 

त्वचा उजळविण्यासाठी मॉइश्चरायझर बनवा. घरचा घरी १ चमचा कॉफी पावडर १ चमचा तांदळाचे पीठ आणि २ चमचे कोमट पाणी हे एकत्रित करून घेणे आणि चेहऱ्यावर लावणे .

त्वचेवरील सुरकुत्या जाण्यासाठी चमचाभर कॉफी घ्या त्यात एक चमचा मध घाला. याचे चांगले मिश्रण तयार करा. त्यानंतर ते चेहऱ्यावर लावा. १० मिनिटापर्यंत चेहऱ्यावर हा लेप तसाच राहू द्या. मग स्वच्छ पाण्यांनी तो धुवून काढा. मॉइश्चरायजर वापर अति उत्तम ठरेल. किमान आठवड्यातून एकदा हा फेस पॅक लावा.

हे ही वाचा :

मिठाचे पाणी पियाल्याने आरोग्यास हे लाभदायक फायदे होऊ शकतात

 

Exit mobile version