spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mansoon Tips, पावसाळ्यात तुमच्या कपड्यांना देखील दुर्गंधी येतेय का? जाणून घ्या, सोपे उपाय!

मुंबईसह संपूर्ण देशभर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेककजण उकाड्याने त्रस्त झाले होते परंतु पावसामुळे हळू हळू सर्वत्र गर्व हा पसरला जात आहे. पावसाळ्यात आपण अनेक गोष्टी घरच्या घरी बनवून खास असतो.

मुंबईसह संपूर्ण देशभर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेककजण उकाड्याने त्रस्त झाले होते परंतु पावसामुळे हळू हळू सर्वत्र गर्व हा पसरला जात आहे. पावसाळ्यात आपण अनेक गोष्टी घरच्या घरी बनवून खास असतो. तसेच सुट्टीच्या दिवशी देखील अनेक साज पावसाचा आनंद हा घेत असतात. परंतु पावसाळ्यात सर्वाना त्रास देणारी एक गोष्ट म्हणजे कपड्यांची दुर्गंधी. पावसाळ्यात आपण आपले कपडे कितीही वेळात धुतले तरी त्या कपड्यांमधून येणारा खूपच वास हा काही जात नाही. हवेतील आद्रतेमुळे हा वास येत असतो. हे दुर्गंधी कपड्यांमधून निघून जावे असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु पावसाळ्यात या समस्येला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. म्हणूनच आज आम्ही यावर काही सोपे उपाय सांगणार आहोत.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात कपडे थेट मशीन मध्ये टाकत असतो. परंतु असेच जर का तुम्ही पावसाळ्यात देखील केले तर त्याला दुर्गंधी जास्त प्रमाणात येते ही दुर्गंधी टाळण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही कपडे हंगर वर लटकवा किंवा मोकळा जागी वाळत घाला. असेच दुर्गंधी घालवण्यासाठी आणखी कोणते प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊया.

लिंबाचा रस (Lemon juice) –

लिंबू हे नैसर्गिक आम्लयुक्त आहे. ते वास येणारी बुरशी नष्ट करू शकते. कपड्यांना दुर्गंधीपासून वाचवण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात कपडे बुडवून ठेवा. काही वेळाने ते कपडे धुवा. किंवा ज्या ठिकाणी दुर्गंधी येते त्या कपड्यांवर लिंबाचा रस लावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

व्हिनेगर (Vinegar)

खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यासोबतच घरात ठेवलेल्या व्हिनेगरचा वापर कपड्यांचा दुर्गंध दूर करण्यासाठीही केला जातो. वास्तविक, व्हिनेगरचे स्वरूप देखील आम्लयुक्त असते आणि ते दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया मारतात. कपड्यांचा वास दूर करण्यासाठी, दुर्गंधीयुक्त पृष्ठभागावर व्हिनेगर घाला आणि नंतर साध्या पाण्याने कपडे धुवा. कपड्यांचा दुर्गंध निघून गेल्याचे दिसेल.

बेकिंग सोडा(Baking soda)

खाण्याचा सोडा कपड्यांमधून दुर्गंधी आणि वास आणणारे जंतु (बॅक्टेरिया) मारतो. एक बादली पाण्यात 1 चमचा खाण्याचा सोडा टाका आणि त्यात कपडे थोडा वेळ भिजत घाला. त्यानंतर त्यांना साध्या पाण्याने धुवा.

कपडे खोलीत वाळत घाला (Dry clothes in the room)

पावसाळ्यात बाहेर ऊन कमी पडतं, त्यामुळे कपडे मशिनमध्ये वाळवण्यापेक्षा हवेशीर खोलीत वाळत घाला. जर खोलीत खिडकी नसेल तर, खेळती हवा येणार नाही. अशा वेळी कपडे वाळत घालताना पंखा सुरु ठेवा.

कपडे कोरड्या जागी ठेवा(keep clothes in a dry place)

कपड्यांमध्ये ओलावा असल्यास कुबट वास येऊ शकतो, त्यामुळे दुर्गंधीपासून कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी कपडे कोरड्या जागी ठेवा. यामुळे तुमच्या कपड्यांना वास येणार नाही. तर, डिटर्जेंटचा सुगंध येईल.

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss