पावसाळ्यात आहारात या गोष्टींचा समावेश तुम्ही केलाच पाहिजे

बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात. मात्र, पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ?

पावसाळ्यात आहारात या गोष्टींचा समावेश तुम्ही केलाच पाहिजे
पावसाळा सुरू होण्याआधीच अनेकांच्या आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसून येते. पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात. कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात. मात्र, पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा, याची पुरेशी माहिती घेतली जात नाही.
चुकीच्या आहाराच्या पद्धतीमुळे पोटदुखी, गॅस, अपचनासोबत पोटाच्या तक्रारी त्रास देण्याची शक्‍यता असते. पावसाळ्यात खूप खावेसे वाटले तरी अन्नाचे पचन मात्र चांगले होत नाही. या ऋतूत पचनास अतिशय हलका असलेला आहार घ्यायला हवा. काहीवेळा खूप खाल्ल्याने पोटाच्या व्याधी निर्माण होतात. तर पावसाळ्यात कोणता आहार घ्यावा हे आपण ह्या लेखात जाणून घेणार आहोत.
१. खमंग भजी ही पावसाळ्यात खाण्यासाठी खूप पौष्टिक असते. परंतु भजी तळण्यासाठी नेहमी शेंगदाण्याच्या किंवा मोहरीच्या तेलाचा उपयोग करावा.
२. पावसाळ्यात सर्वात उत्तम धान्य म्हणजे नाचणी तुम्ही नाचणीचे पापड, भाकरी किंवा लापशी पण खाऊ शकता.
३. पावसाळ्यात जास्त गोड खाऊ नये. आंबट, तिखट, कडू, तुरट खाल्ले तरी चालेल.
४. मूग, मसूर अशी कडधान्ये पचायला हलकी असतात. त्यामुळे त्यांचा जास्त प्रमाणात आहारात समावेश करावा. चवळी, वाटाणा, पावटे, मटकी अशी धान्ये जास्त खाऊ नयेत.
५. पावसाळ्यात मसाले घालून बनवलेली मूग, मसूर, तूर, चवळी या कडधान्यांची कढणे किंवा पाणी, टॉमेटोचे सार, आमसुलाचे सार किंवा कढी उदा. फुलके, भाजलेला पापड खावेत.
Exit mobile version