पावसाळ्यात आहारात ‘या’ रानभाज्यांचा समावेश नक्की करा.

पावसाळा सुरु झाला की आहारात वेगवेगळ्या प्रकारे बदल केले जातात. त्यात बरेचदा घरच्या गृहिणींना कोणत्या भाज्या बनवाव्यात असा प्रश्न नेहमी पडतो. याच मौसमात रान भाज्यांना जास्त प्राधान्य दिले जाते.

सर्वाना हवाहवासा असलेला पावसाळा हा ऋतू आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. जबरदस्त उन्हाचा सामना करून हैराण झालेले लोक पावसाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. पावसाळा सुरु झाला की आहारात वेगवेगळ्या प्रकारे बदल केले जातात. त्यात बरेचदा घरच्या गृहिणींना कोणत्या भाज्या बनवाव्यात असा प्रश्न नेहमी पडतो. याच मौसमात रान भाज्यांना जास्त प्राधान्य दिले जाते. आपण बघणार आहोत पावसाळ्यात कोणत्या रान भाज्यांचा समावेश केला पाहिजे

पावसाळ्यात या रान भाज्यांचा समावेश करा.

१. कंठोळी भाजी
ही एक फळभाजी असून ती पावसाळ्यात कमीतकमी पंधरा दिवसात पूर्ण उगवते. ही भाजी कारल्या सारखी दिसते आणि चवीला कडू सुद्धा असते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते. ही भाजी आहारात असल्यास अनेक फायदे होतात. कांठोळीची वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. कर्टोली ला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात.

२. कुलूची भाजी –
पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानोमाळ दिसू लागते. अगदी काही दिवसातच ही भाजी तयार होत असल्याने बाजारात सर्वात आधी याच भाजीचं आगमन होतं.

३. कुरडूची भाजी –
हे एक प्रकारचं तण असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुरडू जातीची पालेभाजी दिसू लागते. कुरडू पालेभाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.

४. टाकळयाची भाजी –
ही भाजी दिसायला मेथीच्या भाजी सारखीच दिसते. रानोमाळी टाकळयाची भाजी गवताबरोबर पसरलेली आपण पाहू शकतो. ठाणे मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुडी सारखी ही भाजी घेता येते.

५. दिंडा भाजी –
दिंडा भाजी पावसाळा संपला की मृत अवस्थेत जाते आणि पावसाळ्याच्या पहिल्या सरीबरोबर त्याला नवे कोंब फुटू लागतात. पूर्ण वाढ होण्याआधीच तिची कोंब खुडले जातात. दिंडाची भाजी खास प्रसिद्ध आहे.

६. भारंगी –
ही भाजी उगवल्यानंतर कोवळी असतानाच तोडली जाते. भारंगच्या पानांच्या कडा करवतीसारख्या दातांसारख्या असतात. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे. ही भाजीसुद्धा झाडाचे नवीन फुटलेल्या कोंबाच्या व पानांच्या स्वरूपात काढली जाते. करवतीसारख्या दातेरी पानांच्या कडा असल्याने याला सिरॅटम् असे म्हटले जाते. यांच्या पानामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. गणपतीच्या सुमारास ह्य़ा झाडास निळसर जांभळ्या रंगाचे फुलांचे तुरे येतात.

वर्षभर मेथी, शेपू, पालक, लाल माठ यांसारख्या नेहमीच्या पालेभाज्या ऐवजी तुम्ही पावसाळ्यात मात्र रानभाज्यांची चव चाखू शकता. वसई, विरार, पालघर, मुरबाड, पनवेल, कल्याण, कर्जत, नेरळ, उरण आणि अलिबाग या भागांमधील बाजारात या भाज्या सहज उपलब्ध होतात.

Exit mobile version