Mother’s Day Special : आईला द्या ”ही” खास भेटवस्तू

'मदर्स डे'दिवशी अनेक ठिकाणी आपल्या आईसाठी कार्यक्रम केली जातात.मैत्रिण, बहिण, मित्रासाठी गिफ्ट घेताना जितका विचार करावा लागत नाही तितकाच विचार आईला नेमकं काय गिफ्ट द्यावं यासाठी करावा लागतो. या खास दिवशी 'आई'ला काय गिफ्ट देऊ शकतो त्याविषयी जाणून घेऊ या..

Mother’s Day Special : आईला द्या ”ही” खास  भेटवस्तू

दरवर्षी प्रमाणे मदर्स डे हा १२ मे ला साजरा केला जातो. ‘मदर्स डे’दिवशी अनेक ठिकाणी आपल्या आईसाठी कार्यक्रम केली जातात.मैत्रिण, बहिण, मित्रासाठी गिफ्ट घेताना जितका विचार करावा लागत नाही तितकाच विचार आईला नेमकं काय गिफ्ट द्यावं यासाठी करावा लागतो. या खास दिवशी ‘आई’ला काय गिफ्ट देऊ शकतो त्याविषयी जाणून घेऊ या..

 सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने महिला कपड्यांवर जास्त वर्क असलेले ड्रेस घालणं टाळतात. त्यामुळे सुती कापड, कॉटन अशा पद्धतीचे ड्रेसेस आईला भेट वस्तू म्हणुन देऊ शकता. जर तुमची ‘आई’ दररोज ऑफिसला जात असेल किंवा तुमच्या आईला ड्रेस घालण्याची आवड असेल तर तुम्ही तिला ड्रेस घेऊन देऊ शकता. जर महागडी पैठणी घेणं शक्य नसेल तर तुम्ही पैठणीच्या साडीचा ड्रेस देखील आई ला या खास दिवशी देऊ शकता त्याच बरोबर ड्रेस सूट यासोबत सुंदर अशी ओढणी असते. सूट तुम्ही ऑनलाइन किंवा बाजारात जाऊन घेऊ शकता. हे सूट तुम्हाला २५० ते ६०० रुपयांना मिळतील.

बाजारात अनेक रंगांचे आणि वेगवेगळ्या डिसाईनचे सूटपिस, कुर्ती-सेट, आले आहेत.त्यामुळे तशा पद्धतीने आईच्या आवडीच्या रंगाचा कुर्ती सेट तुम्ही देऊ शकता. त्यासोबत त्याला साजेशी असे दागिने घ्या,छान गुलाबाचं फुल देऊन तिच्यासोबत गप्पा गोष्टी करा. तिच्यासोबत छान वेळ घालवा ज्यामुळे तिला स्पेशल वाटेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ‘मदर्स डे’साजरा करु शकता.

हे ही वाचा:

Katrina kaif प्रेग्नेंट? पण कोणामुळे?

Mother’s Day का साजरा करतात तुम्हाला माहिती आहे का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version