Thursday, July 4, 2024

Latest Posts

National Doctor’s Day 2024 : या दिनाचं महत्त्व काय ? डॉक्टर्स डे का साजरा करतात?

ज्या प्रमाणे मदर्स डे, फादर्स डे साजरा करतात त्याचप्रमाणेच जागतिक डॉक्टर्स डे हा १ जुलै रोजी संपूर्ण देशात साजरा केला जातो. या विशेष दिवसाची ही कहाणी.. 

डॉक्टर्स म्हणजे दुसरे देवचं असं म्हटंल जातं. कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता त्यांनी सर्वसामान्यांचे जीव वाचवले. कोविड काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांना जीवनदान दिले. पण त्याच डॉक्टरांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारा एक विशेष दिवस साजरा केला जातो. ज्या प्रमाणे मदर्स डे, फादर्स डे साजरा करतात त्याचप्रमाणेच जागतिक डॉक्टर्स डे हा १ जुलै रोजी संपूर्ण देशात साजरा केला जातो. या विशेष दिवसाची ही कहाणी..

१ जुलै १८८२ रोजी बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय (Dr. Bidhan Chandra Roy) यांचा जन्म झाला. बिधान यांनी १८९७ मध्ये पाटणा कॉलेजिएट स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.बिधान यांनी कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून IA आणि गणितात ऑनर्ससह पटना कॉलेजमधून बीए केले. ते सामाजित क्षेत्रात देखील कार्यरत होते. सलग १४ वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. भारतीय अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आणि कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज केला आणि त्यांना १९०१ मध्ये कोलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

शिक्षण घेत असताना बिधान यांनी १९०९ मध्ये लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लंडनधील सेंट बार्थोलोम्यू हॉस्पिटलमध्ये नोंदणी करण्यासाठी गेले. सलग २९ वेळा त्यांचा अर्ज नाकारण्यात आला मात्र जिद्दीच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा अर्ज भरण्याचा प्रयत्न केला आणि ३० व्या प्रयत्नात त्यांचा अर्ज स्विकारण्यात आला आणि मे १९११ मध्ये रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सचे सदस्य आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जनचे फेलो होण्यासाठी पात्र ठरले.यानंतर त्यांना डॉक्टरकीची पदवी प्राप्त झाली. त्यांना  १९६१ मध्ये भारतरत्नही देण्यात आला होता.

लंडनहून परत आल्यानंतर ते राजकारणात देखील सक्रिय झाले होते पण या संपूर्ण कार्यकाळानंतर १ जुलै १९६२ रोजी डॉ. बिधान रॉय यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ १ जुलै १९९१ रोजी भारतात प्रथमच ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा करण्यात आला. त्यांचे मानवतेच्या सेवेत अधिक मोलाचे योगदान देखील आहे. खरं तर कोविड काळात डॉक्टरांचे महत्त्व शब्दात न मांडता येणारे होते. डॉक्टरांच्या या साथीला एकच सुचतं की,”रुग्णसेवेचे ज्यांनी अखंड व्रत हाती घेतले असे डॉक्टरांच्या रुपातील देव आम्हास भेटले”.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss