spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

New Year 2023 यंदा नव्या वर्षात करा आनंदी राहण्याचा अनोखा संकल्प !

नवीन वर्षाचे म्हणजेच २०२३ चे (New Year 2023) स्वागत करण्यासाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. या नवीन वर्षात तुम्ही काही संकल्प करण्याचाही विचार केला असेल.

New Year 2023  :  नवीन वर्षाचे म्हणजेच २०२३ चे (New Year 2023) स्वागत करण्यासाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. या नवीन वर्षात तुम्ही काही संकल्प करण्याचाही विचार केला असेल. येणाऱ्या नवीन वर्षात नेहमी आनंदी राहण्यासाठी (Be Happy) तुमच्यामध्ये नेहमी सकारात्मक उर्जा (Positive Energy) असणे आवश्यक आहे. सकारात्मक राहण्यासाठी स्वतःला कमी लेखणं, कीव करणं, टाळा. आज आपण या लेखातून नेहमी सकारात्मक राहण्यासाठी कोणते उपाय करावे, हे पाहणार आहोत. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. आपले आरोग्य निरोगी राहिले तर आपले जीवन सुखी आणि आनंदी राहते. त्यामुळे नेहमी हसत-खेळत जगा. जर तुम्ही जीवनाकडे अगदी खोलवर पाहिले, तर जीवन हे एक ठराविक व्याप्तीचे अवकाश आहे. तुम्ही जीवनाकडे केवळ घटनांचा एक क्रम म्हणून पाहिल्यास जीवन एक ठराविक कालावधी आहे. तुम्ही तुमच्या मानसिक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहिले तर, जीवन म्हणजे ठराविक समस्यांचे गाठोडे आहे.

दररोज आपण सर्व प्रकारच्या लोकांना भेटतो. त्यांच्या समस्यांची विविधता अविश्वसनीय आहे. जन्म ही एक समस्या आहे, मृत्यू ही एक समस्या आहे, आणि या दोन्हींमध्ये समस्यांची एक अविरत मालिका आहे. आता, नवीन वर्ष येत आहे. तुमच्याकडे हा पर्याय आहे : तुम्ही तुमचे विचार, भावना आणि ऊर्जा, समस्या निर्माण करण्यासाठी गुंतवणार आहात की समस्या सोडवण्यासाठी? याचा अर्थ असा नाही की तुम्ही समस्या निर्माण न करण्याचा संकल्प केला पाहिजे. तुम्ही संकल्प करता कारण तुम्हाला असे काहीतरी करायचे असते, ज्याकडे तुमचा स्वाभाविक कल नसतो. पण साधी गोष्ट अशी आहे की, तुमचा कल नैसर्गिकरित्या आनंदी असण्याकडे असावा. म्हणून आज आम्ही या बातमीमधून तुम्हाला आनंदी राहण्याच्या अनोखा संकल्पना सांगणार आहोत.

  • तुम्ही जेवढं सकारात्मक राहाल तेवढा दिवस उत्तम जाईल.
  • सतत तणाव, दु:ख यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. स्वत:साठी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक दिवस आपल्याला चांगला वाटतो. आपले पाय खेचणारे आहेत त्यामुळे तुम्ही कायम आनंदी असाल तर त्याचा तुमच्या कामावर चांगला परिणाम होणार आहे.
  • आपल्याला इतर कोणीही प्रोत्साहन दिलं नाही तरीही आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो हे कायम लक्षात ठेवा. अशावेळी आरशामध्ये स्वत:सोबत बोलण्याचा प्रयत्न करा. स्वत:ला प्रोत्साहन देऊन स्वतः आनंदी राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.
  • आयुष्यात नियोजनाला आणि वेळेला फार महत्त्व आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि चुकलेलं नियोजन तुमचा सगळा दिवस, वेळ आणि वर्ष संकट ओढवू शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट हि वेळेत करून आनंदी राहायला शिका.
  • इंटरनेट आणि मोबाईलमुळे आजकाल लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही आणि मोबाईलसमोर वेळ घालवतात. त्यामुळे झोपेची पद्धत बिघडते आणि त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. आणि आपण आजारी पडलो कि मग आपली चिडचिड हि वाढते. अशा स्थितीत या वर्षी ठरवा की, तुम्ही लवकर झोपाल आणि मोबाईल वगैरे दूर ठेवून झोपाल. जेणे करून तुमची झोप नीट होईल आणि उठल्यावर तुम्ही आनंदी रहाल.

हे ही वाचा:

मासिक पाळीचा त्रास का होतो ?

New Year 2023 यंदाच्या वर्षी १२ न्हवे तर चक्क १३ महिन्यांचं असणार हिंदू कॅलेंडर!

New Year 2023 च्या सेलिब्रेशनसाठी परदेशात जाण्याचा प्लॅन करताय? तर चुकूनही जाऊ नका ‘या’ देशांमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss