spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिवाळीत ध्वनी प्रदुषणाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो ; अशी घ्या काळजी

दिवाळी हा आनंदाचा सण. फटाके आणि मिठाई या सणाची उत्कंठा वाढवतात. पण या उत्साहात आरोग्याबाबत कोणताही निष्काळजीपणा करणे महागात पडू शकते. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार किंवा न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या आहेत त्यांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फटाक्यांच्या स्फोटाच्या आवाजामुळे अशा आजारांना बळी पडणाऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. संशोधकांना असे आढळून आले की, फटाक्यांच्या अचानक फुटण्याचा आवाज जरी ९० डेसिबलच्या खाली असला तरी अशा रुग्णांसाठी हानीकारक ठरू शकतो.

हेही वाचा : 

Ramdas Kadam : ‘ज्याला कावीळ असते त्याला जग पिवळं दिसतं’, ठाकरेंच्या दौऱ्यावरून रामदास कदमांचं टीकास्र

प्रथम आहार आणि हृदयाचा संबंध समजून घ्या : 

कामिनी सिन्हा यांच्या मते, तेलकट आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असलेले पदार्थ कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढवतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो. अशा स्थितीत ऑक्सिजनयुक्त रक्त पुरेशा प्रमाणात हृदयापर्यंत पोहोचत नाही आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखी घातक स्थिती उद्भवते. हृदयाला योग्य रक्तपुरवठा होण्यासाठी कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रित राखली पाहिजे. कोलेस्ट्रॉलची समस्या प्रामुख्याने खाण्यापिण्यामुळे उद्भवते आणि हेल्दी डायटने सहज नियंत्रित करता येते. थोडक्यात असे म्हणता येईल की, चांगले खाल्ल्याने बहुतेक रोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनाही संतुलित आहारामुळे बराच आराम मिळेल.

ऑक्टोबर महिन्या अखेरीच सिनेप्रेमींसाठी बॉलीवूडची खास मेजवानी, पहा ‘ही’ चित्रपटांची यादी

आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?

पुण्यातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कार्डियाक सर्जरीचे प्रमुख डॉ. हेमंत जोहरी सांगतात की, दिवाळीच्या काळात प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाच्या समस्यांबाबत अनेकदा बोलले जाते, परंतु हृदयरोग्यांना येणाऱ्या समस्यांची दखल घेतली जात नाही.

ज्या लोकांना हृदयविकार आहे किंवा उच्च रक्तदाबासाठी औषधे घेत आहेत, त्यांच्यासाठी मोठ्या आवाजाच्या संपर्कात येणे ही समस्या असू शकते. फटाक्यांच्या अचानक मोठ्या आवाजामुळे रक्तदाब आणि हृदय गती वाढू शकते. यामुळे अनेक प्रकारच्या हृदयाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका असतो.

IND vs PAK: ऋषभ पंतला पाहून चाहत्यांनी ‘उर्वशी-उर्वशी’ ओरडत गोंधळ घातला, पाहा हा व्हिडिओ

त्याच बरोबर वायुप्रदूषणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधं घ्यावीत. ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या नाहीत, त्यांनीदेखील स्वतःची काळजी घ्यावी. धूळ, धूर आणि प्रदूषणापासून शक्यतो दूर राहावं. घरातून बाहेर पडताना मास्क लावावा. शरीर हायड्रेटेड ठेवावं. ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर लेव्हल नियमित तपासावी. हृदयविकाराच्या झटक्याची कोणतीही लक्षणं दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss