बॅग भरा आणि बाहेर पडा; सप्टेंबरपासून सुरू होतायत भारतीय रेल्वेचे ‘हे’ तीन टूर पॅकेज… जाणून घ्या सविस्तर

बॅग भरा आणि बाहेर पडा; सप्टेंबरपासून सुरू होतायत भारतीय रेल्वेचे ‘हे’ तीन टूर पॅकेज… जाणून घ्या सविस्तर

फिरायला जायला आवडत नाही असा कोण व्यक्ती क्वचितच कुठे तरी आपल्याला पाहायला मिळेल. त्यात सप्टेंबर महिना म्हंटलं तर पावसाचे दिवस. पाऊस थोड्या फार प्रमाणात चालूच असतो. पावसातून सर्वत्र वातावरण निसर्गरम्य झालेलं असते. या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) तीन टूर पॅकेज आणलेत. भारतीय रेल्वेने उपलब्ध करून दिलेले पॅकेज म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.

चेन्नई ते शिर्डी टूर पॅकेज (Chennai to Shirdi Tour Package)
चेन्नई ते शिर्डी टूर पॅकेज हे ४ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. हे टूर पॅकेज ३ रात्री आणि ४ दिवसांचे आहे. पॅकेज फी दोन लोकांच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी ही ३६३० रुपये असणार आहे. परंतु एकट्याने प्रवास केल्यास पॅकेज फी ५५०० रुपये इतकी असेल. या पॅकेजमध्ये ट्रेनसह कॅबमध्येही प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. हे पॅकेज तिकीट तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन किंवा रेल्वे स्टेशनच्या बुकिंग काउंटरवरून देखील बुक करू शकाल.

मुंबई ते अहमदाबाद टूर पॅकेज (Mumbai to Ahmedabad Tour Package)
मुंबई ते अहमदाबाद टूर पॅकेज हे ४ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. हे टूर पॅकेज ४ रात्री आणि ५ दिवसांचे असेल. या पॅकेजमध्ये ट्रेनसह कॅबमध्येही प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. पॅकेज फी दोन लोकांच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी ही २५२३५ रुपये इतकी असेल. परंतु एकट्याने प्रवास केल्यास पॅकेज फी ४५८१० रुपये इतकी असेल. या पॅकेजमध्ये इतर उपलब्ध सुविधांच्या माहितीसाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून वाचू शकता.

बरेली, गोरखपूर, हरदोई आणि लखनौ येथून डेहराडून-हरिद्वार टूर पॅकेज (Deharadun and Haridwar Tour Package)
हे टूर पॅकेज ६ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे आणि हे ५ रात्री आणि ६ दिवसांचे टूर पॅकेज आहे. या पॅकेजमधून तुम्हांला डेहराडून, हरिद्वार, मसुरी आणि ऋषिकेशला ट्रेनसह कॅब सुद्धा प्रवासादरम्यान मिळेल. पॅकेज फी दोन लोकांच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी ही २२६१५ रुपये इतकी असेल. परंतु एकट्याने प्रवास केल्यास पॅकेज फी ३८९७५ रुपये इतकी असेल.

हे ही वाचा:

Exit mobile version