spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पनीर कचोरी आवडते ?तर नक्की करून पाहा

पनीर हा पदार्थ मऊ आणि लुसलुशीत असणारा पदार्थ आहे.

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आवडणारा भाजीतील पदार्थ म्हणजे पनीर. पनीर पासून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. पनीर हा पदार्थ मऊ आणि लुसलुशीत असणारा पदार्थ आहे.पनीर कचोरी रेसिपी कचोरीचा ही एक अतिशय अप्रतिम भाग आहे .ज्यामध्ये तुम्हाला पनीरची मजेदार चव चाखायला मिळते. हे बनवायलाही खूप सोपे आहे.

रेसिपी –

साहित्य –

१/२ कप मैदा

मीठ चवीनुसार

३ मोठे चमचे तेल

१/२ पाणी

१ मोठा कांदा

२ हरी मिरची

३/४ छोटे चमचे जिरे पावडर

१ छोटे चमच धणेपूड

१/४ चमचे लाल मिरची पावडर

१/२ वाटी पनीर किसलेले

साखर

कोथिंबीर

१/२ मोठा चमच लिंबूचा रस

कृती –

सर्व प्रथम बाउलमध्ये मैदा पाणी आणि मीठ चवीनुसार घालून मळून घेणे आणि ते पिट हलक्या पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवणे. त्यानंतर कढई मध्ये तेल घालून कांदा चांगला परतून घेणे. त्यानंतर हिरवी मिरची,जिरे पावडर,धणेपूड,लालमिरची पावडर,आणि पनीर किसलेले घालून मिश्रण चांगले परतून घेणे. चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि कोथिंबीर घालून परत एकदा मिश्रण परतून घेणे. आणि परतल्या नंतर मिश्रणा मध्ये लिंबाचा रस घालून हलक मिश्रण परतून घेणे. मग मिश्रण थंड करण्यासाठी एका पेल्ट मध्ये काडून घेणे. त्यानंतर मिश्रण थंड झाल्यावर मेदाचा पिटाचे गोळे तयार करून त्यांना गोल आकारामध्ये लाटून घेणे आणि त्यामध्ये थंड झालेल मिश्रण भरून तेलामध्ये तळून घेणे आणि गरमागरम पनीर कचोरी तयार आहे.

हे ही वाचा:

आज राज्यात हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, चार जणांचा मृत्यू

रक्तातील साखर संतुलित करण्यापासून ते पचनशक्ती वाढवण्यापर्यंत: हिबिस्कस कोम्बुचाचे अनेक फायदे जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss