‘या’ टीप्स नवीन पालकांनी अवश्य पहा

मुलं पालकांना बघून काही गोष्टी नकळत शिकत असतात.  त्यासाठी पालकांनी या गोष्टी केल्या ही पाहिजे आणि त्या मुलाना शिकवल्या सुद्धा पाहिजे. 

‘या’ टीप्स नवीन पालकांनी अवश्य पहा

आजच्या धावपळीच्या आयुष्यात मुलांचे पालनपोषण योग्य पध्दतीने करणे हे देखील पालकांसमोर मोठे आव्हान आहे. जेव्हा मुले मोठी होऊ लागतात तेव्हा पालकांनी मुलांना काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. लहान मुले जसजशी मोठी होत जातात तसतशी पालकांची जबाबदारी वाढत असते. मुलं पालकांना बघून काही गोष्टी नकळत शिकत असतात.
त्यासाठी पालकांनी या गोष्टी केल्या ही पाहिजे आणि त्या मुलाना शिकवल्या सुद्धा पाहिजे.

1. मुलांना पुरेसा वेळ द्या 

मुलं पालकांना बघून काही गोष्टी नकळत शिकत असतात अशावेळी पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त चांगला वेळ घालवावा. मुलांना आई-वडिलांची वेळ हवी असते. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीत सहभागी व्हा. यामुळे तुमचं आणि मुलाचं नातं चांगल होईल.

2. प्रत्येकाचा आदर करायला शिकवणे 
लहानपणापासूनच आपल्याला मुलींचा सन्मान करायला शिकवले जाते. जर तुम्हीही तुमच्या मुलांना हेच शिकवत असाल तर त्यांना मुलासोबत मुलीचाही आदर करायला शिकवा. असे केल्याने तुमच्या मुलांमध्ये मुलगा-मुलगी असा भेदभाव निर्माण होणार नाही.

3. मुलांना त्यांच्या मनाविरूध्द कामं देऊ नका

या वयात मुले अनेकदा त्यांचे एक विशेष स्थान तयार करण्यासाठी इच्छुक असतात. कधी कधी मित्रांमध्ये लोकप्रियता वाढवण्यासाठी ते अशा गोष्टी करतात, ज्या त्यांच्या मनाविरूध्द असतात. असे करण्यापासून तुम्ही तुमच्या मुलांना वाचवले पाहिजे. त्यांना सांगा की मनाविरूध्द काम केल्याने त्रास होण्याची शक्यता असते.

4. मुलांचे मित्र व्हा  

काही वेळा भीतीमुळे मुले त्यांच्या पालकांशी त्यांच्या मनातील बोलू शकत नाही. त्यांना असे वाटते की त्यांनी जर त्यांच्या मनातील गोष्टी त्यांच्या पालकांना सांगितल्या तर कदाचित त्यांना ओरडा मिळू शकतो. जर तुम्ही तुमच्या मुलाला हे पटवून दिले तर बाकी गोष्टी सहज शक्य होतात. मुलांसोबत चांगल्या मित्रासारखे राहा. त्याला वेळ द्या. त्याला एकट वाटू देऊ नका. मित्रत्वाचं नातं कायमच खास असतं. त्यामुळे मुलाचे पालक असलात तरी पहिले मित्र व्हा.

5. मुलांशी सामंजस्यतेने वागा आणि बोला  

कायमच अतिशय शांतपणे सामोरे जा. लहान मुलांच मन अतिशय कठीण असतं. अशावेळी त्यांच्याशी कठोर पद्धतीने न वागता अतिशय शांतपणे वागा. प्रत्येक गोष्ट समजावून सांगा.

Exit mobile version