अचानक दारू पिणे सोडल्याने शरीरावर होतील घातक परिणाम

अचानक दारू पिणे सोडल्याने शरीरावर होतील घातक परिणाम

सुरूवातीला मजा म्हणून दारू प्यायली जाते. पण नंतर दारू हीच प्राथमिकता होते आणि हळूहळू दारूच्या आहारी माणूस जाऊ लागतो. असे अनेक किस्सेही ऐकू येतात जिथे दारूमुळे घरदार उद्धस्त झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याआहेत. दारू पिणे शरीरासाठी चांगले नाही , दारू पिण्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. हा ईशारा दारू विकणाऱ्यांना देण्यात येतो. त्याशिवाय वेगवेगळ्या माध्यमातून दारूच्या नुकसानाबाबत सांगितले जाते. पण, तरीही दारूची विक्री अजूनही चालू आहे. दारूमुळे वेगवेगळे आजार निर्माण होतात. दारू कधीही हळूहळू सोडणे योग्य आहे. दारू अचानक सोडल्याने मेंदूवर परिणाम होतो.तर आज आम्ही दारू अचानक सोडली तर शरीरावर काय परिणाम होतील तुम्हाला सांगणार आहोत.

दारू सोडण्याचे उपाय : दारु पिणे सोडले तर शरीरामध्ये चांगले बदल दिसून येतील. दारू पिणे सोडले तर मेंदूवर परिणाम होत नाही आणि मेंदूही चांगले काम करतो. दारू बंद केल्याने कोणतेही आजार होत नाहीत. रोज सफरचंद खाल्यानी दारू सोडण्यात मदत होते. एक ग्लास पाणी घ्यावे आणि त्यात लिंबू पिळावे आणि मिश्रण दिवसातून २ प्यावे हे प्यायल्याने दारू सुटते. खजूर वाटून पाण्यात मिक्स करून दिवसातून २ वेळा पिणे या मुळे दारूची तलप लागत नाही. दारू सोडण्यासाठी स्वतःलाच स्वता वचन द्या आणि सवय करून घ्या.

अचानक दारू सोडल्याने काय होत: अचानक दारू सोडल्याने मेंदूवर परिणाम होतो. दारू अचानक सोडल्याने भूक न लगणे,डोके दुखणे,चिडचिड होणे,ताणतणाव वाटणे,इमोसशनल होणे असे परिणाम दिसून येतात. त्यामुळे दारू सोडायची असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. दारू सोडल्याने हृदयविकाराचा आजार होऊ शकतो. दारूमुळे आतील शरीर कमजोर होते. आणि रक्तदाब कमी होतो. रक्तदाब कमी झाल्याने आपल्या मेंदूवर परिणाम होतो. दारू अचानक सोडल्याने माणसाला लकवा मारतो आणि कमजोरी येते. आणि हात पाय सुजतात. दारू जास्तप्रमाणत प्यायल्याने जीवघेण्या समस्या उद्धभवू शकतात.

हे ही वाचा:

रक्तातील साखर संतुलित करण्यापासून ते पचनशक्ती वाढवण्यापर्यंत: हिबिस्कस कोम्बुचाचे अनेक फायदे जाणून घ्या

उद्धव ठाकरे करणार कमबॅक? ४ आमदार बाहेर पडले तर शिंदे सरकारचे होणार नुकसान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version