REALME 10 Pro + 5G आणि REALME 10 Pro 5G ची भारतात एन्ट्री

कॅमेरा आणि आकर्षक डिजाईन यासाठी रिअलमीचे फोन लोकप्रिय आहेत. अशात रिअलमीच्या चाहत्यांसाठी अजून आनंदाची बातमी आहे. कंपनीने ग्राहकांसाठी दोन नवीन स्मार्टफोन उपलब्ध केले आहेत.

REALME 10 Pro + 5G आणि REALME 10 Pro 5G ची भारतात एन्ट्री

कॅमेरा आणि आकर्षक डिजाईन यासाठी रिअलमीचे फोन लोकप्रिय आहेत. अशात रिअलमीच्या चाहत्यांसाठी अजून आनंदाची बातमी आहे. कंपनीने ग्राहकांसाठी दोन नवीन स्मार्टफोन उपलब्ध केले आहेत. कंपनीने भारतात Realme 10 Pro+ 5G आणि Realme 10 Pro 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. काय आहेत या दोन्ही फोनच्या किंमती आणि कोणते आकर्षक फीचर्स मिळत आहेत, याबाबत जाणून घेऊया.

Realme 10 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच कर्व्ह अमोलेड डिस्प्ले, अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित रिअल मी यूआय 4.0, ऑक्टा कोअर 6 एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 5जी एसओसी, माली जी 68 आणि 8 जीबी रॅम मिळते. फोनमध्ये 108 एमपी प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून सेल्फीसाठी 16 एमपी कॅमेरा मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 5 हजार एमएएच बॅटरी मिळत असून ती 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन 47 मिनिटांमध्ये 100 टक्के चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.

Realme 10 Pro+ 5G या स्मार्टफोनचा ६ जीबी रॅम आणि 128 जीबी रोम व्हेरिएंट 28 हजार 999 रुपयांमध्ये, तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी रोम व्हेरिएंट 25 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी रोम व्हेरिएंटची किंमत 27 हजार 999 रुपये आहे. Realme 10 Pro 5G स्मार्टफोनबाबत बोलायचे झाल्यास फोनचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी रोम व्हेरिएंट 18 हजार 999 रुपयांमध्ये, तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी रोम व्हेरिएंट 19 हजार 999 रुपयांमध्ये मिळत आहे.

Realme 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच फूल एचडी + डिस्प्ले, अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित रिअल मी यूआय 4.0, स्नॅपड्रॅगन 695 5जी एसओसी, अड्रिनो ए619 जीपीयू, 8 जीबी रॅम, 108 एमपी प्रायमरी कॅमेरा, सेल्फीसाठी 16 एमपी कॅमेरा, 5 हजार मेगाहर्ट्झची बॅटरी, 33 वॉट सुपर व्हीओओसी फास्ट चार्जिंग मिळते. फोन 20 मिनिटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.

दोन्ही स्मार्टफोन हायपरस्पेस, डार्क मॅटर आणि नेब्युला ब्ल्यू या तीन रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन्स तुम्ही फ्लिपकार्ट, रिअलमी.कॉम आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळांवरून खरेदी करू शकाल. Realme 10 Pro+ 5G १४ डिसेंबरपासून, तर Realme 10 Pro 5G 16 डिसेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा : 

पुण्यात होणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा, शरद पवारांसह उत्तर प्रदेशामधील ‘या’ खासदाराला केलं आमंत्रित

खडसे आपलेच आहेत त्यांना सहकार्य करावे, बाळासाहेब थोरातांनी दिला पाठिंबा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version